Khed News : चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना खुली ऑफर

कारण, २०२४ मध्ये पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत
Chandrakant Patil- Dilip Mohite
Chandrakant Patil- Dilip Mohite Sarkarnama
Published on
Updated on

कुरुळी (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांना खुली ऑफर दिली. आमदार मोहिते यांनी कुटुंबातील कोणीही माणूस आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये द्यावा. कारण, २०२४ मध्ये पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत, अशा शब्दांत मोहिते कुटुंबीयांना पाटील यांनी भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. (Chandrakant Patil's gave offer to NCP MLA Dilip Mohite's join BJP)

खेड तालुक्यातील मोई येथे हर घर जलजीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी पाटील यांनी मोहिते यांना भाजप प्रवेशाबाबत ऑफर दिली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ सोई सुविधा दालनाचे लोकार्पण करण्यात आले.

Chandrakant Patil- Dilip Mohite
Bhaskar Jadhav Vs Rane : नारायण राणेंची ती ऑफर मी ठामपणे नाकारली आणि... : भास्कर जाधवांनी सांगितली ती गोष्ट

ग्रामीण भागातील गावच्या महिलांच्या डोक्यावरचा आणि काखेतला हंडा उतरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हर घर जल जीवन योजना अंतर्गत हर घर नळ पाणीपुरवठा कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असून गावातील लोकांनी चांगले काम करून सर्वांना पाणी मिळेल अशी व्यवस्था असावी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Chandrakant Patil- Dilip Mohite
Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांची सोडतीन वर्षांनंतर जाहीर कबुली : राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको होती...

आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, देशात आणि राज्यात सत्ता येत असते आणि जात असते. ग्रामीण भागातील नागरिक आता हुशार झाले आहेत. गुगलवर सर्च करतात कोणी काम आणले. कोणी काम केले सांगावं लागत नाही. मध्यंतरीच्या काळात पालकमंत्र्यांनी परिपत्रक काढलं की पुणे जिल्ह्यात कुठे परवानगीशिवाय उद्‌घाटन, भूमिपूजन कार्यक्रम घेऊ नये; परंतु सगळ्याच कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना येणं शक्य नाही आणि त्यांना बोलवले होते. परंतु ते आले नाहीत. या कार्यक्रमाला आले तर त्यांचे आमच्या खेड तालुक्यात स्वागत आहे.

हर घर जल जीवन योजनेसाठी गावाला जमीन नसल्याने उपसरपंच गोरख गवारे, संजय, संदीप, मच्छिंद्र गवारे यांच्या कुटुंबीयांनी योजनेला जागा खरेदीसाठी पन्नास टक्के रक्कम स्वतः दिली. उपसरपंच गोरख गवारे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या कामाचे ठेकेदार अमित मुऱ्हे, विशाल सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

Chandrakant Patil- Dilip Mohite
Ravindra Dhangekar : ‘भाजपचा पैसा जनतेचा खिशात; पण धंगेकर जनतेच्या मनात होता’ : नूतन आमदाराची इंदापुरात पेढेतुला

या वेळी आमदार सचिन आहिर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अतुल देशमुख, शांताराम भोसले, कल्पना गवारी, शरद बुट्टे पाटील, राम गावडे, भगवान पोखरकर, रामदास धनवटे, बाबाजी काळे, सरपंच शीला रोकडे, उपसरपंच गोरख गवारे, ग्रामपंचात सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com