Chandrakant Patil : चंद्रकांतदादा म्हणतात; माझी व्यक्तिगत भूमिका छोट्या महापालिकांच्या बाजूचीच !

PMC News : फुरसुंगी, उरळी देवाची गावे वगळल्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

PMC News : महापालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळल्याने पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून माजी मंत्री विजय शिवतारे व आमदार संजय जगताप हे आमने सामने ठाकले आहेत. दरम्यान, आज भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राज्य सरकारच्या आदेशावरून कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरात दोन महापालिका करण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पुणे महापालिकेत (PMC) २०१७ मध्ये ११ तर २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली आहे. या गावात मूलभूत सुविधा पुरविण्यास होणारा विलंब व वाढलेला मिळकतकर यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्‍वभूमीवर फुरसुंगी, उरळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळली आहेत. त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर पाटील यांनी वाघोली भागाची नगरपरिषद करावी किंवा वाघोली हडपसर ही पूर्व भागाची महापालिका स्थापन करावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे.

Chandrakant Patil
Pankaja-Dhnanjay Munde News : भगवान गडावर मुंडे बहिण-भावाने केलेला संकल्प पुर्णत्वास जाणार का ?

याबाबत पाटील यांनी सांगितले की, "महापालिकेच्या हद्दीलगतची गावे महापालिकेत आणून येथील कारभार अवघड करणे योग्य नाही. ग्रामपंचायतींचा विकास झाला पाहिजे, पण प्रशासनही तेथीलच असले पाहिजे. सध्या केंद्र सरकार, राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचयतींना निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लहानच असाव्यात, अशी माझी भूमिका आहे. पण सरकार म्हणून एखादा निर्णय घेतला जातो, तो मान्य असतो. त्यानुसार पुढील कामे आम्ही करतो."

Chandrakant Patil
Pankaja Munde : महंत नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले, पंकजा मुंडेंनी अहंकार कमी करावा..

४० टक्के मिळकतकर माफीचा निर्णय झालेला आहे. मात्र त्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या समोर आलेला नाही. त्यावर पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचा वेळ उपलब्ध नसल्याने त्यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झालेली नाही. त्यांची स्वाक्षरी झाली की तो वित्त विभागाकडे जाईल. त्यानंतर मंत्रीमंडळा पुढे येईल. पुढील दोन तीन दिवसात स्वाक्षरी होईल. मिळकतकर भरण्यास ३० एप्रिलपर्यंत महापालिकेने मुदतवाढ दिली आहे. त्यापूर्वी अंतिम निर्णय होईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com