Chandrashekhar Bawankule: '' सरडा सुद्धा कमी वेळा रंग बदलतो,पण उद्धव ठाकरे...''; बावनकुळेंची खरमरीत टीका

Chandrashekhar Bawankule: आम्ही रेशमबागेत जातो तेव्हा...
Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankulesarkarnama

Chandrashekhar Bawankule Latest News : महाराष्ट्रात सध्या टोळीचं राज्य आहे. त्यांनी याआधी पक्ष चोरला, दुसऱ्यांचे वडील चोरले. आता या टोळीची नजर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पडली आहे. त्यामुळे आरएसएसने वेळीच सावध व्हावं. कारण शिंदे रेशीमबागेत येऊन गेलेत. तिथे लिंबू-टाचण्या कुठे पडल्या आहेत का ते पाहावं. एकनाथ शिंदेंची वृत्ती, नजर वाईट आहे अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
'अजितदादा, संधी असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही' : फडणवीसांनी ठेवले दुखऱ्या नसेवर बोट

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. बावनकुळे म्हणाले, सरडा सुद्धा कमी वेळा रंग बदलतो पण उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांचं संघावरील वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आहे. कारण आम्ही रेशमबागेत जातो तेव्हा आमच्या मनात एक वेगळी भावना असते पण राजकीय शक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी संघाविषयी बोलणं आणि इतकी खालची पातळी गाठणं याचा मी निषेध करतो.

Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
RSS कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी लिंब टाकलीत का तपासा ? ; असं ठाकरे भागवतांना का म्हणाले..

बावनकुळे म्हणाले, राज्यातून सीमाभागातील जनतेला भडकावले जात आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील लोक भडकावू भाषण करतात. उद्धव ठाकरे यांनी ठरावाचं अभिनंदन करायला हवं होतं. पण ते ज्याचा संबंध नाही अशी वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. सीमाभागातील लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. राज्याची टाचणीभरही जागा जाणार नाही असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com