Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणजे वाद! मनोज जरांगेंचा घणाघात

Shantata Rally In Pune : पुण्यातील शांतता रॅलीत मराठा समाजाचे लाखो लोकांनी गर्दी केली होती.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यात शांतता रॅली काढली आहे. पुण्यातील शांतता रॅलीत त्यांनी 'साम' टीव्हीला विशेष मुलाखत दिली.

त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत फक्त छगन भुजबळांमुळे वाद वाढत असल्याचा आरोप केला. तसेच 29 ऑगस्टपर्यंत निर्णय झाला नाही तर 288 पाडण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही जरांगेंनी महायुतीला दिला आहे.

पुण्यातील शांतता रॅलीत मराठा समाजाचे लाखो लोकांनी गर्दी केली होती. यावेळी 'साम' टीव्हीच्या प्रतिनिधीने जरांगे पाटील Manoj Jarange यांना विविध प्रश्न विचारले असता त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. आरक्षणावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला आहे. तो वाद कोण थांबवणार, असा प्रश्न केला त्यावर जरांगेंनी राज्यात तसा काही वाद नसल्याचे सांगितले.

जरांगे पाटील म्हणाले, असा कुठेही वाद नाही. फक्त छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणजे वाद. ते पहिल्यापासून गोरगरीबांचे आरक्षण घेत आहेत. त्यांनी मायक्रो ओबीसींसाठी काय काम केले? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायाचा होता. कुठे केला त्यांनी. गावखेड्यात मराठा आणि ओबीसींचे एकमेकांशिवाय काम होत नाही. आम्ही गावात एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो. त्यामुळे कुठेही तसा वाद नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Rajendra Raut : 'रोहित पवार आता तू हाय अन्‌ मी हाय...' : टीका जिव्हारी लागलेल्या राजेंद्र राऊतांचे खुले चॅलेंज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि अजित पवार यांनी 29 ऑगस्टच्या आत कुणबी आणि मराठा हे एक असल्याचा कायदा पारित करावा. सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी करावी. नाहीतर माझा नाईलाज होईल. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. पण माझा समाज तुम्हाला झोपवल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला लेकरे मोठी आहे. तुम्ही नाही. तुम्हाला आम्ही पायदळी तुडवणारच, असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Ncp News : महायुतीचा पहिला उमेदवार ठरला ! अजितदादांनी केली घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com