सासवड (जि. पुणे) : राज्यात झालेल्या सता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा मंगळवारी (ता. २ ऑगस्ट) पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर (purandhar ) तालुक्याच्या सासवड (Saswad) येथे होणार आहे. या सभेत शिंदे पवारांवर काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागून राहिली आहे. (Chief Minister Eknath Shinde's Saswad will have a meeting on Tuesday)
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी उरुळी पाणी योजना, हवेलीतील गावांचा अवाजवी टॅक्स आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार अशा विविध मुद्द्यांची या सभेत तड लागणार असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याकडून सांगण्यात आले. त्यादृष्टीने सभा व पुरंदर हवेलीत शिंदे यांची भेट महत्वाची मानली जाते. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलुखमैदानी तोफ गुलाबराव पाटील, गुवाहाटी डायलॉगफेम आमदार शहाजीबापू पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे दिग्गज उपस्थित राहणार आहेत, असेही शिवतारे म्हणाले.
राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यानंतर त्यांच्या पाठीशी माजी आमदारांपैकी सर्वात प्रथम कोण उभे राहिले असेल, तर ते म्हणजे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे. शिवतारे आणि शिंदे यांचे सख्य असल्याने उठावानंतर मध्यस्थी करण्याची तयारीही शिवतारे यांनी दर्शवली होती.
दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. २ ऑगस्ट) होणारी सभा ही सासवडच्या मोठ्या पालखीतळ मैदानावर होणार आहे. या मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे. मधल्या काळात सासवड पालिकेने हे मैदान सभांसाठी द्यायला बंद केले होते. शिवतारे यांच्या शिवसेना प्रवेशाची २००८ मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा याच मैदानावर झाली होती.
शहाजीबापूंच्या भाषणाकडे लक्ष
काय झाडी, डोंगार आणि हाटील.. सगळं ओक्के... डायलॉगफेम शहाजीबापू पाटील यांचं भाषण ऐकायला पुरंदर-हवेलीत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील हेदेखील उद्या मैदान गाजवणार, अशी चर्चा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आहे, असे दिलीप यादव म्हणाले. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.