Laxman Jagtap passed away : आता पुन्हा 'लाजवा'ची मैफल रंगणार नाही; जगतापांच्या जाण्याने कार्यकर्ते गहिवरले

Laxman Jagtap News : लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवडवर शोककळा
BJP Laxman Jagtap Death
BJP Laxman Jagtap DeathSarkarnama

Laxman Jagtap death : भारतीय जनता पक्षाचे (BJP) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ६०) यांचे मंगळवारी (ता. ३) दीर्घ आजाराने निधन झाले. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवडवर (Pimpri Chinchwad) शोककळा पसरली आहे. त्यामुळे आता पुन्हा ती 'लाजवा'ची मैफल रंगणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

'लाजवा' म्हणजे पूर्वी एकाच पक्षात राष्ट्रवादीतील (लांडे, जगताप, वाघेरे) यांचा ग्रुप. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील (Vilas Lande-Patil), माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचा ग्रुपला पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात 'लाजवा' ग्रुप म्हणून ओळखला जात होते.

BJP Laxman Jagtap Death
Jagtap-Tilak News : दुर्धर आजारातही पक्षनिष्ठा शिकविणारे दोन झुंजार नेते भाजपने १२ दिवसांत गमावले

अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शाळेतील झेंडावंदनासाठी, बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहरातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील 'लाजवा'ची (लांडे-जगताप-वाघेरे) मैफल खूप वर्षांनी रंगली होती.

या निमित्ताने हे नेते जुन्या आठवणीत रमले होते. लांडे आणि जगताप हे जवळचे, तर वाघेरे-आणि जगताप हे दूरचे नातेवाईक आहेत. तिन्ही पाटील घराणी असून शहराच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. २००२ ला 'लाजवा ग्रुप' मधील तिघेही (विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि संजोग वाघेरे-पाटील) नगरसेवक होते. तेव्हा त्यांचा हा ग्रुप जमला होता. त्या नावाने तो ओळखला जात होता. बारा वर्षे तो कायम होता. २०१४ ला जगताप हे भाजपमध्ये गेले आणि लाजवा गट फुटला. त्यानंतर हे तिघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, आता जगताप यांच्या निधनामुळे ही बैठक पुन्हा होणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पन्नास दिवस 'आयसीयू'तील उपचारानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात आमदार जगताप घरी आले होते. त्यानंतर १० जून व २० जून रोजी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी ते कार्डियाक अॅम्बूलन्सने मुंबईला गेले होते. नंतर ते घरीच आराम करीत होते. त्यानंतर नवी सांगवीतील न्यू मिलेनियम शाळेत जाऊन त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन केले होते. यानंतर जगताप यांची राष्ट्रवादीच्या ज्येष्ट नेत्यांसह तरुन नेत्यांनी घरी जाऊन प्रकृतीची चौकशी केली होती. जगताप यांच्या निधनानंतर या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

BJP Laxman Jagtap Death
Laxman Jagtap Death news update : तडफदार नेतृत्व काळाने हिरावले: एकनाथ शिंदे

दरम्यान, आपण दोघे काय (वल्ली) आहोत, हे फक्त आपल्यालाच माहित आहेत, असे जगताप हे माजी आमदार लांडे यांना त्यावेळी म्हणाले होते. त्याला इतरांनी सूचक दाद दिली होती. त्यातून जगतापांच्या स्मरणशक्ती व उपरोधिक स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला होता. तिथे (राष्ट्रवादी) राहून काय उपयोग, आता तिथे कोण आणि किती प्रामाणिक राहिलेत, असा टोला जगताप यांनी लांडेंना लगावला होता. जगताप यांच्या जाण्यामुळे आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com