Chinchwad By-Election : मेहनत घेतली तर चिंचवडची निवडणूक अवघड नाही, अजितदादांना विश्वास!

Ajit Pawar : बंडखोर कलाटेंचे मन वळविण्याचे राष्ट्रवादीचे कसोशीने प्रयत्न सुरु!
Chinchwad By-Election : Ajit Pawar
Chinchwad By-Election : Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-Electon : मेहनत घेतली,तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अवघड नाही, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निवडणुकीचे आज रणशिंग फुंकले. आघाडीकडून नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचा आशावाद व्यक्त केला आहे.

दरम्यान, इच्छुकांची मांदियाळी आणि त्यांच्यात उमेदवारी मिळवण्यावरून सुरु असलेली चढाओढ पाहता काल रात्रीपर्यंत चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत एकमत झाले नव्हते. अखेर सकाळी सर्वोच्च नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काटे यांचे नाव निश्चीत झाले.त्याला खुद्द अजितदादांनीच दुजोरा दिला.

Chinchwad By-Election : Ajit Pawar
Chinchwad By-Election: जगताप दाम्पत्याकडे आहे बत्तीस कोटींची मालमत्ता: पण स्वत:च्या नावावर एकही गाडी नाही....

शिवसेना (ठाकरे) बंडखोर राहूल कलाटे यांच्यामुळे ही लढत तिरंगी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल असे बोललं जातंय, असे विचारले असता तुम्ही काय ज्योतिषी झाला आहात का,अशी उलट विचारणा त्यांनी केली. त्याचवेळी तिरंगी लढतीत मते ट्रान्सफर व्हावी लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Chinchwad By-Election : Ajit Pawar
Kasba By Election : राष्ट्रवादीकडून काटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब अन् कसबा 'बिनविरोध'च्या चर्चांना पूर्णविराम!

दरम्यान,चिंचवडमध्ये बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले शिवसेनेचे कलाटे यांचे मन वळविण्याचे कसोशीने प्रयत्न राष्ट्रवादीने सुरु केले आहेत. पक्षाचे चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके,पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडमधून पक्षाकडून प्रबळ इच्छूक असलेले भाऊसाहेब भोईऱ, राजेंद्र जगताप यांनी कलाटेंची वाकड येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते आघाडीसोबत असतील, राहतील असा विश्वास शेळके व गव्हाणेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com