Ashwini Jagtap: चिंचवडमध्ये महायुतीचा उमेदवार फायनल? दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील संघर्ष टळला!

Shankar Jagtap candidacy from chinchwad assembly election 2024: दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसा मीच असल्याचे सांगत विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभेवर दावा सांगितला होता. उमेदवारीवरून जगताप कुटुंबात वाद रंगणार असल्याचे चित्र होते.
Ashwini Jagtap
Ashwini JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा वाद मिटला आहे. गेल्या काही महिन्यापासून भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती, त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ''माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी देण्यात द्यावी," अशी मागणी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.अश्विनी जगताप यांच्या माघारीमुळे शंकर जगताप यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी मिळणार आहे.अशा परिस्थितीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसा मीच असल्याचे सांगत विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभेवर दावा सांगितला होता. तर शंकर जगताप यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.

चिंचवडमधून मीच लढणार,अशी भावना शंकर जगताप यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून बिनसलं असल्याचीही चर्चा होती. मात्र मागील काही दिवसांपासून हा वाद संपुष्टात आला आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळीही शंकर जगताप विधानसभा लढण्यास इच्छुक होते. ते लक्ष्मण जगताप यांचे बंधु आहेत. पक्षाने मात्र त्यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. आता पुन्हा उमेदवारीवरुन जगताप कुटुंबामध्ये रस्सीखेच सुरु होती.

Ashwini Jagtap
Konkan Politics: पराभवाची हॅट्रिक साधा; निवडणुकीला सामोरे जा! केसरकरांनी राजन तेलींच्या 'वर्मा'वरच ठेवलं बोट

आमदार अश्विनी जगताप, त्यांचे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यावेळी अश्विनी यांनी माझ्याऐवजी शंकर जगताप यांनी उमेदवारी द्या, अशी मागणी बावनकुळे यांच्याकडे केली.चिंचवडच्या जागेववरुन जगताप कुटुंबात वाद रंगणार असल्याचे चित्र होते. पण आता अश्विनी यांनी माघार घेतल्याने जगताप कुटुंबातील राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे.

भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार असली तरी भाजपमधीलच शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते यांनीही आपली तयारी सुरू केली आहे. चिंचवड शहरात ठिकठिकाणी यांचेही बॅनर लागले आहेत. त्यांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com