सरकारनामा ब्यूरो
पुणे : पुण्यात चौदा वर्षीय मुलीचा अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येचा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकी रोजच बळी पडत असून यांच्यासाठी राज्य सरकार कधी बंद पाळणार असा सवाल वाघ यांनी वाघ यांनी केला आहे.(Chitra Wagh said; when Maharashtra close for Savitri's Daughter-ug74)
पुण्यात घडलेली घटना समजताच वाघ यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध करीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारला प्रश्न विचारला आहे. कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर पोलिसांचे कायदे कागदावर अशी सरकार आणि पोलिसांची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कबड्डीपटू असलेल्या एका १४ वर्षीय आठवीत शिकणाऱ्या मुलीची पुण्यात बिबवेवाडी येथे निघृण हत्या करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, जि. सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
क्षितीजा ही आठवीत शिकत होती, त्याचबरोबर ती कबड्डी खेळाडूही होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या काही मैत्रीणींसमवेत मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरामध्ये कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी शुभम व त्याचे दोन साथीदार तेथे आले.
मुली सराव करीत असतानाच, शुभमने क्षितीजाला खेळातून बाहेर ओढले. त्यानंतर त्याने त्याच्याकडील कोयत्याने क्षितीजाच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याच्या मित्रांनी देखील त्यांच्याकडील शस्त्रांनी वार केले.या हल्ल्यामध्ये क्षितीजाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. या घटनेनंतरही क्षितीजाच्या मैत्रीणींनी आरोपीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील शस्त्रे, पिस्तुल मुलींवर रोखले. मात्र, त्याला गोळीबार करता आला नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये घबराट पसरली.
Edited By : Umesh Ghongdae
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.