कात्रज डेअरीत मिळालेली नोकरी सोडली...अन्‌ थेट संघाचा चेअरमनच झालो..!

गेली तीस वर्ष मी संचालक म्हणून काम करत आहे.
Vishnu Hinge
Vishnu HingeSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. आंबेगाव) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (कात्रज डेअरी) क्लार्क पदाच्या भरतीसाठी मी गेलो होतो. त्या परीक्षेत पास होऊन मला क्लार्कपदाची ऑर्डरही मिळाली होती. पण, त्यावेळी पगार फक्त तीनशे रुपये होता. त्यामुळे कात्रजची नोकरी न स्वीकारता कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० मध्ये राजकारणात आलो आणि थेट कात्रज डेअरीचा दोन वेळा चेअरमन झालो, या पदाच्या माध्यमातून अनेक युवकांना देऊ शकलो, अशी आठवण पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितली. (Clark's job Not accepting in Katraj Dairy, I became chairman directly : Vishnu Hinge)

आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील दूध शीतकरण केंद्राचे व्यवस्थापक सुभाष म्हातारबा थोरात आणि तुकाराम गावडे हे ३४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना अध्यक्ष हिंगे बोलत होते.

हिंगे म्हणाले की, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो. त्या वेळी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष हे माजी खासदार अशोकराव मोहोळ होते. त्यांनी माझी मुलाखत घेतली होती, त्यानंतर माझी नोकरीसाठी निवडही झाली होती. पण मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कुटुंब कसे चालवायचे, असा माझ्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे मी नोकरी न स्वीकारता पुण्यातील विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वकील झालो. पण, कोर्टात वकिली न करता ऑइलची एजन्सी घेऊन व्यवसाय सुरू केला.

Vishnu Hinge
सोमय्यांना रसद पुरविण्याचा आरोप असणारे कदम अडचणीत : शिवसेना नेतृत्व कारवाईच्या पवित्र्यात

दरम्यानच्या काळात माजी आमदार सहकार महर्षी (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील यांचा सुरुवातीला आणि त्यानंतर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा सहवास लाभला. दिलीप वळसे-पाटील आमदार म्हणून प्रथमच निवडून आल्यानंतर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढविणे फार अवघड होते. पण, देवदत्त निकम यांच्यासारखे अनेक जण मदतीसाठी आले आणि मी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचा संचालक झालो. गेली तीस वर्ष मी संचालक म्हणून काम करताना दोन वेळा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आज राज्यात प्रगतीच्या शिखरावर असलेल्या दूध संघांमध्ये पुणे जिल्हा दूध संघाचा समावेश आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. सुभाष थोरात यांनी अवसरी दूध शीतकरण केंद्राचे संकलन व उपपदार्थ विक्रीत वाढ होण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.

Vishnu Hinge
मोदी, शहांनी माझ्या पराभवाचा कट रचला

या प्रसंगी दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे, बेलनाथ महाराज, डी. एम. शिंदे, लेखापरीक्षक कैलास तांबडे, रामभाऊ ढोबळे, बाळासाहेब टेमगिरे, मारुती शिंदे, सुदाम थोरात, व्यवस्थापक नारायण डोके ,सरपंच माऊली भोर, संध्या थोरात, शारदा गावडे, सुजाता शेटे, डॉ. महेश जाधव उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com