Pune Political News : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पार पडली. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपात तोलमोल केल्याचा आरोप केला. यावर सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यात खडाजंगी झाली.
या बैठकीला खासदार शरद पवार Sharad Pawar हेही उपस्थित होते. त्यांनीही बारामतीबाबत प्रश्न उपस्थित केले. तर खासदार सुळे यांनी जिल्ह्यातील मावळला निधी मिळतो, पण शिरूर आणि बारामतीला निधी मिळत नाही, अशी तक्रार केली. यावर मावळचे आमदार सुनील शेळके चांगलेच चिडले. त्यातूनच शेळके आणि सुळे यांच्यात भर सभेत शाब्दिक चकमक झाली.
सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणाल्या, जिल्ह्यातील मावळला निधी दिला जातो, त्याचे आम्ही स्वागत करतो. दुसरीकडे मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. आम्हाला निधी का मिळत नाही? असा खडा सवालच सुळेंनी उपस्थित केला. त्यावर आमदार शेळकेंनी आपला आक्षेप नोंदवला.
ते म्हणाले, ताई आम्ही कधीच बारामती-बारामती करत नाही. तुम्ही सारखे मावळचा उल्लेख करत आहात, असा पलटवार शेळकेंनी केला. त्यावर सुळेंनी आमच्या मतदारसंघांना कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही. मग आम्ही फक्त बैठकांनाच हजेरी लावायची का? असा प्रतिप्रश्न केला.
अनेक महिन्यानंतर शरद पवार, अजित पवार Ajit Pawar आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकत्र आले होते. ते तिघेही एकमेकांपासून अंतर राखून बसले होते. यावेळी पवारांनी केलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तरही दिले. मात्र त्यांच्यात काही संवाद झाला नसल्याची माहिती आहे. सुळे आणि शेळके यांच्यातील वाद अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोर सुरू होता. त्यामुळे त्यांच्यात कुणीही हस्तक्षेप केला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.