Pune Metro Expansion : मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना मोठं गिफ्ट! 'या' मार्गावरील मेट्रोचा होणार विस्तार

Eknath Shinde, Ajit Pawar : राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कर्ज, या माध्यमातून या निधीची उभारणी होणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Pune News : वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या नव्या विस्तारीत एलिव्हेटेड मेट्रो मार्गांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ११) बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रोच्या या विस्तारीत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आता केंद्राचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुणेकरांसाठी हे मोठे गिफ्ट असल्याचे मानले जाते. ()

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते नुकतेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उदघाटन झाले आहे. सध्या वनाज- रामवाडी हा १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. तसेच या मार्गावर विस्तारीत मेट्रो मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी तीन हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहे.

Eknath Shinde
CAA Notification : सीएए कायद्याची अधिसूचना अन् काही क्षणांतच सरकारची 'ही' वेबसाइट क्रॅश

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कर्ज, या माध्यमातून या निधीची उभारणी होणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे आता केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड (पीआयबी) यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण होईल. तेथे मंजुरी मिळाल्यावर हा प्रकल्प रेल्वेखात्यामार्फत केंद्र सरकराच्या मंत्रिमंडळापुढे अंतिम मंजुरीसाठी पोहोचेल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. (Latest Political News)

दरम्यान, वनाज ते चांदणी चौक या १.१२ किलोमीटरच्या दरम्यान दोन स्थानके होणार आहेत. तर रामवाडी ते वाघोली या ११.६३ किलोमीटरच्या अंतरात ११ स्थानके होणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तारही वेगाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. नव्या विस्तारीत मेट्रो मार्गांमुळे उपनगर शहराशी जोडले जाणार असल्याने त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

Eknath Shinde
PCNDTA News : कॅबिनेटमध्ये साडेबारा टक्क्यांचा निर्णय; जीआर निघण्यापूर्वीच रंगली श्रेयवादाची लढाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com