Pune Assembly Election 2024 : महाविकास आघाडीची पंचसूत्री नव्हे तर थापासूत्री : मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टीका

‘‘लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीचे नेते टीका करीत होते. ती योजना सुपरहिट झाल्यानंतर आता त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करीत आहेत. महाविकास आघाडीची पंचसूत्री नाही, तर थापासूत्री आहे
eknath shinde
eknath shindesarkarnama
Published on
Updated on

पुणे : ‘‘लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीचे नेते टीका करीत होते. ती योजना सुपरहिट झाल्यानंतर आता त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करीत आहेत. महाविकास आघाडीची पंचसूत्री नाही, तर थापासूत्री आहे. त्यात महायुती सरकारच्या सर्व योजनांचा समावेश केला आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडविली.

पुणे शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोखलेनगर येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमदार चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह शिवाजीनगरचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे, हडपसरचे उमेदवार आमदार चेतन तुपे, कसब्याचे उमेदवार हेमंत रासने, परशुराम वाडेकर, किरण साळी आदी उपस्थित होते.

सुमारे तासभराच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील अडीच वर्षांतील महाविकास आघाडीचा कार्यकाळ आणि महायुतीच्या सरकारच्या कारभाराची तुलना केली. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा अहवाल मांडावा. आम्ही सव्वादोन वर्षांत केलेली विकासकामे मांडतो. समोरासमोर चर्चा होऊन द्या, असे आव्हानही त्यांनी महाविकास आघाडीला दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, नदीजोड, सिंचन प्रकल्पांना स्थगिती दिली. विकासविरोधी सरकार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. २०१९ मध्ये जनतेने महायुतीला कौल दिला होता. पण काही जणांनी सत्तेच्या मोहापायी अनैसर्गिक आघाडी केली.’’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

- लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

- त्या बदनाम करण्याचा प्रयत्न सावत्र भावांनी केला.

- पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही.

- लाडकी बहीण आणि भावांसाठी शंभर वेळा कारागृहात जायला तयार

चंद्रकांत पाटील म्हणाले...

- मुख्यमंत्री कशालाच नाही म्हणत नाहीत

- अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ

- दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिले, नवीन सरकार आल्यावर २१०० रुपये देऊ

- महायुतीचे सरकार आले तरच पुण्याचा आणि महाराष्ट्र विकास होईल

- विरोधकांचे सरकार येण्याची शक्यता नाही

- नवी मुंबईमध्ये जागतिक विमानतळ होणार

- जिल्ह्यातील २१ आमदार महायुतीचे आले पाहिजेत

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले....

- विरोधक विचारतात शिवाजीनगर मतदारसंघात काय केले.

- तर शिवाजीनगरमध्ये ३० पैकी १० मेट्रो स्थानके आहेत.

- त्यामुळे वाहतुकीची समस्या खूप कमी झाली.

- महायुती सरकारने या मतदारसंघासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला.

- लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून कामदेखील सुरू

- यापुढेही महायुतीचे सरकार आल्यावर मोठा विकास करू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com