BJP News: CM फडणवीसांनी सांगितला 'सीजेपी' चा लाँग फॉर्म; पुण्यातून विरोधकांचं पुढचं 'टार्गेट'ही केलं जाहीर

Pune BJP Meeting: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘फेक नरेटिव्ह’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘फेक नरेटिव्ह’ची फॅक्टरी सुरू झाली असून, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे.
devendra fadnavis (6).jpg
devendra fadnavis (6).jpgsarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘फेक नरेटिव्ह’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘फेक नरेटिव्ह’ची फॅक्टरी सुरू झाली असून, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे. या खोट्या प्रचाराला भाजप कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमे आणि युवा शक्तीच्या माध्यमातून आक्रमकपणे जशास तसे उत्तर द्यावे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्हाला कमजोर समजू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला देत कार्यकर्त्यांनाही आगामी राजकीय लढाईसाठी सज्ज केले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (ता.31) पुण्यात पार पडली. या बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’च्या लढाईतील अस्त्र आणि शस्त्र तेच आहेत; मात्र, विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, असे सांगत काँग्रेसच्या राजकारणावर सडकून टीका केली.

हिंदुत्वाच्या विचारधारेवर भाजपला पराभूत करता येत नसल्याने आता ज्यांचे कोणतेही उत्तरदायित्व नाही, अशा संघटनांना पुढे करून सरकारला प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सक्रिय असलेल्या १८० संघटनांकडूनच आता वातावरणनिर्मिती केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

संविधानाचे नाव घेतले जात असले, तरी संविधानाची मूल्ये पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांसारख्या संविधानिक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा डाव असल्याचे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis (6).jpg
ShivSena News : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा राजीनामा होणार? मंत्रिपदावर राजेश क्षीरसागरांची नजर : जाहीरपणे बोलून दाखविली खदखद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हटले आहे, तेच युवा पिढीला संभ्रमित करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, राष्ट्रविचाराने प्रेरित तरुणांची संख्या मोठी असून, भाजपने त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसकडून महिला आरक्षणाची हत्या

‘वंदे मातरम्’ हे मातृशक्तीचे प्रतीक आहे. मात्र, ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी’ ही ओळ सुरू होताच सोनिया गांधी यांनी थयथयाट सुरू केला, अशी टीका फडणवीस यांनी केली. देशाला पितृसत्ताक म्हणणाऱ्यांना ‘वंदे मातरम्’मधील मातृशक्तीचे प्रतीक खुपते, असा टोला लगावत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाची राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हत्या केल्याचा आरोप केला. काहीही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२९च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू करतील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

devendra fadnavis (6).jpg
Mahayuti Dispute : आंबेगावमधील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; एकतर्फी प्रेम करून चालत नाही : सचिन अहिरांचा टोला

पुण्यात महिलांसाठी अनेक समाजिक सुधारणा झाल्या, याच पुण्यात येऊन राहूल गांधी महिलांबद्दल खोट बोलून गेले. महिलांचे ऐवढच जर कैवारी होता तर मग संसदेत मुस्लीम महिलांना पोटगी देण्याचा सर्वोच न्यायालयाने दिलेला निर्णय का बदलला असा प्रश्‍नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

‘सीजेपी’ म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम

काँग्रेस जनता पार्टीवर टीका करताना फडणवीस यांनी ‘सीजेपी’चा अर्थ ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असा सांगितला. या उपक्रमात चार-पाच प्रमुख चेहरे पुढे दिसत असले, तरी त्यांच्या आडून ‘भारत जोडो’ यात्रेतील संघटना कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

devendra fadnavis (6).jpg
ShivSena News : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा राजीनामा होणार? मंत्रिपदावर राजेश क्षीरसागरांची नजर : जाहीरपणे बोलून दाखविली खदखद

पुढचे लक्ष्य कुंभमेळा...

राम मंदिरात दुर्दैवाने घोटाळा झाला असला, तरी तो तब्बल १,८०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगून राम मंदिर लुटून खाल्ल्याचा आरोप केला जात आहे. हिंदुत्वाला विरोध करून मते मिळत नसल्याने असे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. आता कुंभमेळा हे विरोधकांचे पुढचे लक्ष्य असल्याचा दावा त्यांनी केला. कुंभमेळ्यातील कामांच्या निविदा २० ते ३० टक्के कमी दराने आल्या असून, त्यातून शेकडो कोटी रुपयांची बचत झाली आहे. प्रत्येक कामाची चार संस्थांकडून तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘फेसबुकवर अडकू नका...

आजची तरुण पिढी फेसबुकपेक्षा इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय आहे. त्यामुळे संवादाचे माध्यम बदलले असून, भाजपनेही हा बदल स्वीकारला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात १८ ते २६ वयोगटातील सुमारे दोन कोटी युवा असून, त्यापैकी किमान दहा लाख युवक-युवतींना युवा मोर्चाशी सक्रियपणे जोडण्याचे लक्ष्य त्यांनी दिले. ‘फेक नरेटिव्ह’ला उत्तर देण्यासाठी डिजिटल माध्यमांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com