Suhas Diwase : जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचा वाढणार 'ताप'; कुणी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

Political News: नियुक्तीला आपचा आक्षेप, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
Pune Collector Suhas Diwase
Pune Collector Suhas Diwase Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र नियुक्ती करीत असताना निवडणूक आयोगाने घातलेल्या याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झालेले आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला असल्यामुळे येत्या काळात जिल्हाधिकारी दिवसेंचा 'ताप' यामुळे वाढणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारलेले सुहास दिवसे यांच्या नियुक्तीला आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. गेल्या चार वर्षापासून दिवसे हे पुण्यात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत, त्याचं उल्लंघन झाले आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी, अशी तक्रार आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Pune Collector Suhas Diwase
चिन्ह अन् पक्ष मिळाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला मेळावा पुण्यात; पार्थ पवारांचं 'शक्ति'प्रदर्शन?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे काही महत्वाचे निकष आयोगाने घालून दिलेले आहेत. एका जिल्ह्यामध्ये तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देत असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात झाला असेल मात्र संबंधित अधिकारी निवडणुकीशी संबंधित काम करणार नसेल तर तो जिल्ह्यात राहू शकतो. मात्र, भविष्यात अशा अधिकाऱ्याकडे निवडणुकीशी संबंधित कोणतेही काम देण्यात येऊ नये, अशी अट आयोगाने घातलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने घातलेल्या याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झालेले आहे. दिवसे यांची बदली ही जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. दिवसेंना वेगळा न्याय आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असे बदली प्रक्रियेत दिसून येतो, असे विजय कुंभार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले सुहास दिवसे हे जुलै 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पीएमआरडीएचे आयुक्त होते. त्यानंतर सप्टेंबर 2022 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ते पुण्यात क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

(Edited by - Sachin Waghmare)

Pune Collector Suhas Diwase
Suhas Diwase News : पुण्याचे कलेक्टर देशमुखांना बदलले, अजितदादांनी दिवसेंना मेनस्ट्रीममध्ये आणले, कलेक्टरांच्या खुर्चीत बसवले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com