Suhas Diwase News : पुण्याचे कलेक्टर देशमुखांना बदलले, अजितदादांनी दिवसेंना मेनस्ट्रीममध्ये आणले, कलेक्टरांच्या खुर्चीत बसवले

Rajesh Deshmukh News : राजेश देशमुखांना क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पद देत पुण्यातच ठेवले.
Suhas Diwase
Suhas DiwaseSarakrnama
Published on
Updated on

Pune Collector News : पुण्याचे कलेक्टर राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अजितदादांचे जवळचे आयुक्त सुहास दिवसे यांची कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर राजेश देशमुख यांना सुहास दिवसेंच्या जागी क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पद देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राजेश देशमुखांच्या बदलीची चर्चा होतीच. अखेर दिवसेंना आता मेनस्ट्रीममध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळचे असल्याने दिवसे यांना ही मोठी संधी मिळाल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suhas Diwase
Pune Crime News : आयुक्तसाहेब गुन्हेगारांची फक्त परेड नको, कारवाई करा; पुणेकर काय म्हणतात?

सुहास दिवसेंचा क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदाचा कार्यकाळ संपला होता, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा होती. शिवाय ते पुणे महापालिक आयुक्त होतील, असंही बोललं जात होतं. मात्र त्यांना अजितदादांनी कलेक्टर पदावर बसवलं आहे.

ठाकरे सकारच्या काळात दिवसेंकडे पीएमआरडीएच्या आयुक्त पदाची जबाबदारी होती. तेव्हाही अजित पवारांमुळे त्यांना हे पद मिळालं होतं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आयुक्त पद सोपवण्यात आलं. मात्र, आता अजितदादांना दिवसे यांना पुण्याच्या कलेक्टरपदी बसवून एकप्रकारे पुन्हा मेनस्ट्रीमध्येच आणलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Suhas Diwase
Vasant More : "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की...", वसंत मोरेंचा स्टेटसमधून सूचक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com