वालचंदनगर (जि. पुणे) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वर्चस्व असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची कलम ८३ अन्यवये चौकशी करण्याची मागणी काखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj jachak) यांनी केली आहे. शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री व राज्याच्या सहकार खात्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे. तसेच, आगाऊ साखर व मळी विक्रीचा व्यवहार थांबविण्याची विनंती साखर आयुक्तांकडे केली आहे, असेही जाचक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Complaint about Pawar-led sugar factory to Chief Minister)
या संदर्भात पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, श्री छत्रपती सहकारी कारखान्यामध्ये २००३ पासून राजकीय नाट्य करण्याची स्पर्धाच सुरु आहे. गतवर्षी साडेबारा लाख टन उसाचे गाळप होऊनही कारखान्यास उर्जितावस्था येत नाही. नवीन प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आठ-आठ वर्ष लागतात का? चालू वर्षीच्या हंगामामध्ये तोडणी वाहतुकीसाठी ४१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. याच्या चाैकशीची मागणी करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी मी साखर निर्यातीच्या बैठकीला हजर असताना केंद्राचे धोरण जाहीर झाले होते.त्यावेळी केंद्र सरकारचे साखर विक्रीचे धोरण जाहीर झाले हाेते. साखर विक्रीच्या धोरणाला विरोध करीत असल्यामुळे मला बैठकीमध्ये बसण्यास काही संचालकांनी विरोध केला होता. संचालक मंडळाने चालू वर्षी केंद्राचे धाेरण जाहीर झालेले नसताना साखर व मळीची आगाऊ विक्री केली असून यामुळे सभासदांचा तोटा झाला आहे. विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळ म्हणत असतील फायदा झाला आहे? तर फायदा नक्की कोणाचा झाला. सभासदांचा की साखर व मळी विकत घेणाऱ्यांचा? याचाही विचार सभासदांनी करावा, असे आवाहनही जाचक यांनी केले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबतत जाहीर चर्चा करण्यास माझी तयार आहे. कारखान्याच्या अध्यक्षांनी कारभाराबाबत जाहीर चर्चा करावी, असे आव्हान जाचक यांनी दिले आहे. या संदर्भात छत्रपती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.