टिव्हीवरील जाहिराती, मोदींच्या भाषणाला भूलू नका ; कन्हैय्याकुमारांचा टोला

''टिव्हीवर दाखवलेल्या सगळ्याच जाहिराती, भाजपच्या जाहिराती, पंतप्रधानांची भाषण खरी नसतात. त्यामुळे कोणी येऊन काय बोलल तर त्यावर विश्वास ठेवायचा नसतो,''
Kanhaiyakumar
Kanhaiyakumarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : ''रात्री टिव्हीवर दाखवणाऱ्या ताकद वाढीच्या गोळ्या खाऊन किती जणांची ताकद वाढली? असा सवाल करत कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैय्याकुमार (Kanhaiyakumar) यांनी टिव्हीवर दाखवले जाणारे सगळचं खरे नसते.  त्यामुळे टिव्हीवर सांगत असणाऱ्या लोकांच्या पण सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो,'' असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांना लगावला. ते पुण्यात आयोजित लोकशाही बचाव सभेत बोलत होते.

कन्हैय्या कुमार म्हणाले, ''टिव्हीवर ताकद वाढवणाऱ्या गोळ्यांची जाहिरात दाखवली जाते. पण त्या गोळ्यांनी किती जणांची ताकद वाढते ? हेमा मालिनीने एका फिल्टरची जाहिरात केली आणि त्यात सांगितल्यानंतर पाणी शुद्ध होते का? सचिन तेंडूलकरने सांगितले कोका कोला थंडा आहे म्हणून काय थंड वाटते का? फेयर&लव्हलीने किती जण गोरी झाली? त्यामुळे टिव्हीवर दाखवलेल्या सगळ्याच जाहिराती, भाजपच्या जाहिराती, पंतप्रधानांची भाषण खरी नसतात. त्यामुळे कोणी येऊन काय बोलल तर त्यावर विश्वास ठेवायचा नसतो,''

देश वाचवणारे कॉंग्रेसमध्ये देश विकणारे भाजपमध्ये

कन्हैय्या कुमार यांनी आज कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरपारची लढाई असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कॉंग्रेसमध्ये देश वाचवणारे तर भाजपमध्ये देश विकणारे लोक आहेत. रोज नवीन कंपनी, संस्था विकायला काढली जात आहे. पण देशाचे नेतृत्व असेच लोक करु शकतात ज्यांना त्याचे महत्व, स्वातंत्र्याचे महत्व समजले आहे.

ज्यांनी BSNL, LIC, AIR INDIA अशा कंपन्या बनवल्या नाहीत, त्यांना त्या संस्थांचे महत्व समजणार नाही. त्या ज्यांनी बनवलं त्यांनाच त्या गोष्टीच महत्व, त्यांनी या संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांनी बनवल नाही त्यांना विकायला १ मिनीट लागला नाही, अशीही टिका कन्हैय्या कुमार यांनी केली.  

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमातही कन्हैयाकुमार यांनी भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लोकशाहीच्या मार्गाने मतपेटीतून आलेला पंतप्रधान देशाचा हुकुमशा बनू पाहात आहे. या प्रवृत्तीला विरोध करायला हवा. येत्या काळात या प्रवृत्तीविरोधात देशातील तमाम जनता लढल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया आता झाली आहे, असे कन्हैयाकुमार सांगितले. शेतकऱ्यांच्या मोर्चा हा काही शेतकऱ्यांचा मोर्चा नाही, असे सांगितले जात होते. मग काही मूठभर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने माघार घेतली का ? असा प्रश्‍न कन्हैयाकुमार यांनी केला.

Kanhaiyakumar
स्वच्छतागृह हटविल्याबद्दल महापौरांवर अॅट्रोसिटीचा आदेश.. नंतर कोर्टाची स्थगिती

कन्हैयाकुमार म्हणाले, ‘‘ या देशाची खरी संस्कृती कॉंग्रेस आहे. कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो समाजतील सर्व वर्गांना एकित्रित आणून त्यांच्यात विश्‍वासाचे वातावरण निर्माण करू शकतो.त्यामुळे कॉंग्रेसवरसध्या टीका होत असली तरी हाच पक्ष देशातल्या सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. या पक्षाचे मूळ देशातील सर्वसामान्यांशी जोडलेली आहेत.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com