Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता. ५) बारामतीमध्ये काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
Nana Patole, Devendra Fadnavis
Nana Patole, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole, Sangram Thopet News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता. ५) बारामतीमध्ये काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मात्र, या कार्यकर्ता मेळाव्याला जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची एकच चर्चा झाली.

त्यातच थोपटे यांनी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यावेळी पटोले यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, देशापुढील मुलभूत प्रश्न बाजूला ठेवून देश विकण्याचे काम भाजपने सुरु केलेले आहे, भविष्यात भाजपच्या धोरणामुळे आर्थिक अराजकतेला देशाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.

Nana Patole, Devendra Fadnavis
Amit Shah News : अमित शाह यांनी ते पोस्टर पाहिले अन् राज्यातील सत्तांतराची वात पेटली?

संविधानाची निर्मिती केलेली होती, त्याची व्यवस्था मोडू पाहत असून ती व्यवस्था वाचविण्याची गरज आहे. जनतेचे प्रश्न कॉंग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. भाजपने 2014 व 2019 च्या निवडणुकीत जी आश्वासने जनतेला दिली आहेत. ती पूर्ण केली नाहीत. मूळ प्रश्नांना बगल देत देशाला विकून देश चालवण्याचे काम भाजप करत आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात राज्यभर भारतीय जनता पक्षाच कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आत्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघर येथे औरंगजेबचा उल्लेख औरंगजेबजी असा केला होता. यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या बाबत बोलताना पटोले म्हणाले, भाजपच्या वतीने सातत्याने महापुरुषांबाबत अवमान केला जात आहे. ज्यांनी या महाराष्ट्राची व्यवस्था वाईट केली त्यांना जी बोलले जाते, यावरून भाजपचा खरा काय आहे ते चेहरा जनतेसमोर आला असल्याचे पटोले म्हणाले.

राज्यपाल सातत्याने अपमानजनक विधाने करत आहेत. अशा राज्यपालांना भाजप हटवत नाही, यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात आली. भाजपचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य केले. त्यामुळे महापुरुषांवरून भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचा टोला पटोले यांनी लगावला.

Nana Patole, Devendra Fadnavis
Laxman Jagtap News : आता लक्ष्मण दिसणार नाही, याचे दुख राहील, खंबीर अजितदादाही गहिवरले

भूक, भय आणि भ्रष्टाचार ही जशी इंग्रजांची मानसिकता होती. तीच मानसिकता आज भाजपच्या काळात असल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. जनतेचा पैसा लुटून विशिष्ट लोकांना व मित्रांना वाटण्याचे काम जे केले जात आहे त्यातून भ्रष्टाचार होत आहे. जी काही परिस्थिती आहे ती इंग्रज राजवटी सारखीच आहे ती कुणालाही नाकारता येत नाही. असेही पटोले म्हणाले. जीएसटीमुळे व्यापा-यांसह सामान्य लोकही त्रस्त आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com