Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक? पण भारतीयांनी 'ही' खबरदारी घ्या; अदर पूनावालांचा सल्ला

Coronavirus : जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता भारत सरकारही अलर्ट मोडवर
Adar Poonawalla
Adar Poonawalla Sarkarnama
Published on
Updated on

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असल्याच समोर आलं आहे. चीन, ब्राझील या देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत सरकार देखील अलर्ट झालं आहे. तर याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विट करत 'घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा' असं सल्ला दिला आहे.

काय आहे अदर पूनावाला यांच ट्विट?

चीनमध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता अदर पूनावाला यांनी देखील याबाबत ट्विट करत आपलं मत मांडले आहे. ते म्हणाले, चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोरोना पुन्हा वाढत आहे हे चिंताजनक आहे. पण आपले उत्कृष्ट लसीकरण मोहिम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. मात्र आपण त्यासाठी भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून नियमांचे पालन केले पाहिजे, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे.

Adar Poonawalla
Bhidewada News : पुण्यातील भिडेवाड्याविषयी मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

तसेच जगभरातील कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार (Government of India) देखील अलर्ट मोडवर आलं आहे. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज आपल्या देशातील कोरोनाच्या तयारीबाबत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये कोरोनाच्या परिस्थितींचा आढावा घेण्यात आला आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, ''कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा'', असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे भारतात देखील पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Adar Poonawalla
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच ; कारागृहातील मुक्काम वाढला..

दरम्यान, चीनसह ब्राझीलमध्ये वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर भारत सरकार देखील अलर्ट झालं असून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, असा सल्ला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com