चिंता वाढली : कोरोनाची पुन्हा उसळी

Covid-19 : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.
Covid 19 Latest Marathi News
Covid 19 Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : कोरोनाने (Covid-19) शहरात पुन्हा डोके वर काढल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका (Pcmc) प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच आतापर्यंत घरीच उपचार घेणारे रुग्ण आता रुग्णालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (Covid 19 Latest Marathi News)

Covid 19 Latest Marathi News
Video: हिम्मत असेल तर समोरासमोर या...; उदयनराजेंचे अजितदादांना आव्हान

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या एक आकडी झाल्याने कोरोनाची तिसरी लाट शमली असे वाटून प्रशासन गेल्या महिन्यात काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, त्यांची चिंता या महिन्यात पुन्हा वाढली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. शिवाय आतापर्यंत ते रुग्णालयात दाखल होत नव्हते. परंतू आजपासून ते ही सुरू झाल्याने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.

Covid 19 Latest Marathi News
मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून ठाकरेंचा हा फॉम्युला यशस्वी ठरणार का ?

दरम्यान, आज (ता.17 जून) 99 नवे कोरोनाचे रुग्ण शहरात आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण आकडा 421 वर गेला. काल 96 नवीन रुग्ण सापडले होते. या महिन्याच्या 1 तारखेला फक्त नऊ जणांना शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव झाला होता. त्या दिवशी एकूण रुग्ण 61 होते. 15 दिवसांत हा आकडा सातपटीने वाढला आहे. यामुळे कोरोनाबाबत पुन्हा काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com