खाकीतील निशस्त्र `दुर्गे`चे धाडस, बॅंकेबाहेर लुटमार करणाऱ्या पिस्तूलधारी लुटारुला पकडले

Crime : दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन पोलीस आयुक्तांनी कौतूक केले आहे.
PImpri-Chinchwad Police Latest News
PImpri-Chinchwad Police Latest NewsSarkarnama

पिंपरी : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये खाकीतील `दुर्गे`चे धाडस पहायला मिळाले. आकुर्डीत महाराष्ट्र बॅंकेच्या दारात भरदिवसा एका पेट्रोलपंपाची १२ लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न सरस्वती काळे या महिला पोलिसाच्या धाडसामुळे फसला. तिच्या कामगिरीची पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी लगेच दखल घेत तिला दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन तिचे कौतूक केले. दोन सजग पेट्रोपंप कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांची याकामी मोठी मदत झाली. (PImpri-Chinchwad Police Crime Latest News)

PImpri-Chinchwad Police Latest News
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

चार लुटारूंचा या घटनेत समावेश असल्याचे आतापर्यंतच्या तपासात सिद्ध झाले आहे. स्थानिक निगडी पोलिसांनी याबाबत जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने त्याबाबत प्रेसनोट काढताना दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला जेरबंद केल्याची फुशारकी उगीचच मारली आहे. पाचपेक्षा कमी आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याने तो दरोडा तथा दरोड्याचा प्रयत्नही होऊ शकत नाही. त्यापेक्षा तुलनेने कमी गंभीर असलेला व परिणामी दोषसिद्धतेनंतर कमी शिक्षा होणारा जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. मात्र, तो दरोडा असल्याचे सांगत शहर पोलिसांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

PImpri-Chinchwad Police Latest News
तडीपारीला कायदेशीर उत्तर देणार : विजय साळवींची पहिली प्रतिक्रिया

अमोल राजाराम चौधरी (वय ३८, रा. मोरेवस्ती, चिखली) हे य़ा घटनेतील फिर्यादी आहेत. ते `एचपी`च्या पेट्रोलपंपावर आकुर्डीत कामाला आहेत. तर, यातील तिन्ही आरोपी हे सुद्धा मोरेवस्ती, चिखलीचेच आहेत. प्रमोद नामदेव चांदणे (वय २२), जयदीप मधुकर चव्हाण (१९) आणि संतोष अभिमान चोथवे (वय २६) अशी त्यांची नावे आहेत.

प्रमोद हा मुख्य आरोपी असून त्याच्याकडून पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यानेच दोन दिवसांत पेट्रोल पंपावर जमा झालेले पैसे बॅंकेत जमा करण्यासाठी आलेल्या चौधरी यांच्या हातातील ११ लाख ९५ हजार ९७० रुपयांची पिशवी बॅंकेच्या दारातच हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी व त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी कैलास देशमुख यांनी प्रतिकार केला. तेवढ्यात महिला पोलिस काळे या ही धावून आल्या. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने प्रमोदला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे भरलेले पिस्तूल सापडले.

PImpri-Chinchwad Police Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

त्याच्या चौकशीतून त्याचे इतर दोन साथीदार यांचीही धरपकड करण्यात आली. जबरी चोरी करण्यासाठी आल्याची कबुली त्यांनी दिली. संतोषने प्रमोदला पिस्तूल दिल्याचे प्राथमिक चौकशीत समजले आहे. चौकशीनंतर त्यांच्या आणखी एका साथीदाराला निगडी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. पुढील तपास फौजदार विकास शेळके करीत आहेत. नवरात्र उत्सवात निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आकुर्डीत देवीच्या मंदिरात मोठी गर्दी होते. त्यामुळे त्या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काळे यांचा त्यात समावेश होता, असे निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com