पिंपरी-चिंचवड गॅसवर; दहा दिवसात रुग्णसंख्या दसपट

Pimpri chinchwad covid update : दहा दिवसात रुग्णसंख्या दसपट
Pimpri Chincwad corportion.jpg
Pimpri Chincwad corportion.jpgSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट पिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने पसरू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा आता चिंतेत पडले आहेत. २९ डिसेंबरला शहरात ८३ ने वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी (ता.७) म्हणजे अवघ्या दहाच दिवसांत १ हजाराने वाढला. त्याबद्दल महापौर माई ऊर्फ उषा ढोरे (Mayor Usha Dhore) यांनी चिंता व्यक्त करीत आणखी कडक निर्बंधाचा इशारा दिला.

गुरुवारी शहरातील कोरोना रुग्णसंख्येत ८१७ ने भर पडली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत यात १ हजार नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १३५ झाली. दरम्यान, दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट वेगाने शहरात पसरत आहे. ती तसेच ओमिक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि एकूणच कोरोना रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सँनिटायजर, सामाजिक व सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.

Pimpri Chincwad corportion.jpg
भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या तरुणांना नरक यातना; जेवणपाण्याविना हाल

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर महापालिका प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर निर्बंध लावण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही महापौर ढोरे यांनी दिला. शहरातील नागरिकांनी राज्य शासनाने व महापालिका प्रशासनाने कोरोनानियमांचे काटेकोर पालन करावे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण न केलेल्यांनी लवकरात लवकर ते घ्यावे. विनाकारण गर्दी करणे टाळावे. लग्न, अंत्यविधीप्रसंगी उपस्थितीच्या मर्यादांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Pimpri Chincwad corportion.jpg
आशिष शेलारांच्या जीवाला धोका?; कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

कोरोनाबाबत वेळोवेळी आढावा घेऊन जम्बो कोविड सेंटरसारख्या उपाययोजना प्रशासन करत आहे. योग्य ती पाऊले उचलली जात आहेत, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने, प्रश्नांना तोंड देण्यास महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही महापौर ढोरे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com