Dattatray Bharne : माझ्याशी गाठ आहे, एकेकाची वाटच लावेन; आमदार दत्तामामा भरणेंची दमदाटी

Indapur Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात ऐन मतदानादिवशी कधी नव्हे ते गैरप्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे बारामतीत राजकीय वतावरण ढवळून निघाले आहे.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama

Baramati Lok Sabha Politics : बारामती लोकसभा मतदारसंघात ऐन मतदानादिवशी मंगळवारी (ता. ७) कधी नव्हे ते प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शरद पवार Sharad Pawar गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली. भरणेमामांनी केलेल्या शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच तो व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रकाराने बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

बारामतील मतदारसंघातील इंदापूर Indapur तालुक्यातील अंथुर्णे गावात हा प्रकार घडला आहे. येथील मतदान केंद्रावरील बूथ परिसरात शरद पवार गटाचे कार्यकर्ते नानासो गवळी पक्षाच्या वतीने मतदारांना स्लीप वाटपाचे काम करत होते. त्यावेळी केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या आमदार भरणेंचा हे पाहून पारा चढला. त्यांनी थेट गवळींना शिवीगाळ करत मतदानानंतर तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे, अशी दमदाटी केली.

भरणे Dattatray Bharne म्हणाले, मतदान झाल्यानंतर सांयकाळी सहानंतर तुम्हाला कोण आहे आईबाप.. गावाला कोण आहे माझ्याशिवाय... प्रपंच करण्यासाठी तुम्हाला माझी मदत लागते ना? सहानंतर तुला कोणीही विचारणार नाही? गावात मतदानादिवशी येणार आणि लोकांना काहीतरी अमिष दाखवणार.. तुझी मस्ती उतरवीण, नीट वाग.. येथून निघून जा.. गावाची वाट लावली तू.. असे म्हणत आमदार भरणेंनी गवळींना शिवीगाळ केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकारानंतर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी Supriya Sule गवळींची भेट घेतली. त्यावेळी तेथे नेमके काय घडले याबाबत गवळींनी त्यांना सविस्तर माहिती दिली. गवळींनी सांगितले, ठरल्यानुसार आपण आपला बूथ लावला. इतर कुणालाही अडचण होणार नाही, याची काळजी घेतली होती. मात्र बुथवर काम करत असताना आमदार भरणेंनी धमकी देत शिवीगाळ केली. काही लोक अंगावर येत होती. मी मात्र कुणालाही उलटून उत्तर दिले नाही, असेही नानासो गवळी यांनी सांगितले.

(Edited Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com