Daund News : दौंड पुन्हा हादरले; भीमानदी पात्रात आज पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळला

Daund News : या मृतदेहाचा आणि पारगाव हत्याकांडाचा...
Daund News
Daund NewsSarkarnama

Daund News : पारगाव (ता.दौंड) येथे भीमानदी (Bhima) पात्रात आज पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र, या मृतदेहाचा आणि पारगाव हत्याकांडाचा काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे.

या मृतदेहाची ओळख पटली असून त्यांचे नाव लक्ष्मण उर्फ लखन बापूराव सूर्यवंशी (वय ४३,रा.पारगाव ता.दौंड जि.पुणे) असे आहे. सूर्यवंशी यांचा मृतदेह पारगाव भीमानदीपुलाजवळ नागरगाव (ता.शिरूर) वन विभागाच्या हद्दीत अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे.

Daund News
Uddhav Thackeray On Shinde Group: "बरे झाले गद्दार गेले म्हणून हिरे सापडले"; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल!

लक्ष्मण हा सुमारे पंधरा दिवसापासून बेपत्ता होता. साधारणतः दीड वर्षांपासून तो एकटाच भाड्याने खोली घेऊन पारगाव येथे राहत होता. आज सकाळी नदी किनारी सूर्यवंशी यांचा मृतदेह दिसला. पारगाव बंधाऱ्यावर त्यांच्या चपला व त्या शेजारी कीटकनाशक औषधांची बाटली, कानटोपी सापडली आहे.

Daund News
Congress News; व्यापारी पेठेत काँग्रेस कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत

लक्ष्मणच्या भोवताली रक्ताचे ओघळ दिसत होते. किटकनाशक पिल्याने रक्ताचे जुलाब होऊन मृत्यू झाला असावा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी लक्ष्मणच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नसून मांडवगण पोलिस चौकीचे सहायक पोलीस उप निरीक्षक राजेंद्र साबळे अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com