Ajit Pawar News: सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या! 'चाळीस वर्षे झाली तरी घरची लक्ष्मी बाहेरची?

Baramati Lok Sabha Constituency 2024: घड्याळ तुमचंच आहे, पक्ष कोणीही चोरलं नाही. 80 टक्के आमदार त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिले आहे. आम्ही दरोडेखोर नाही, चोरटे नाही आम्ही काम करणारी माणसं आहोत,' असे अजित पवार म्हणाले.
Baramati Lok Sabha Constituency 2024
Baramati Lok Sabha Constituency 2024Sarkarnama

Pune News: मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे,असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रत्युत्तर दिले आहे. 'जुना काळ आता संपला आहे, सासूचे चार दिवस संपले आहेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या!आपण घरची लक्ष्मी म्हणून सुनेकडे पाहतो, मात्र चाळीस वर्षे झाली तरी ती बाहेरची? असा प्रश्न उपस्थित करीत अजितदादांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना उत्तर दिले आहे.

मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या विधानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. "पायाला भिंगरी लावल्यासारखे काहीजण दौरे करीत आहेत. 'चहाला येतो' असे सांगत आहेत. मात्र मागच्या काळात कधी त्यांना आठवण झाली नाही," असा टोला अजितदादांनी विरोधकांना लगावला.

"अजितदादा कामाचा माणूस आहे. काम करायला धमक आणि ताकद असावी लागते. गोड बोलून काम होत नाहीत. भावनिक होऊन कामे होत नाहीत. या ठिकाणी तुम्हाला जसा अजित पवारांवर विश्वास आहे, तसा देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. आपलं बजेट कोयना धरणासारखे आहे. मात्र, केंद्राचे बजेट हे समुद्रासारखा आहे, आपल्यातले लोक केंद्रामध्ये होते, मात्र त्यांनी आपल्या समस्या केंद्रातून सोडवल्या गेल्या नाहीत. दिल्लीला जर मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार गेला तरच आपले काम होईल, मात्र विरोध करणारा खासदार गेला तर काम होणार नाही. भाषणही द्यावे लागतात आणि कामही करावं लागते, असे सांगत सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता अजितदादांना त्यांना टोमला हाणला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati Lok Sabha Constituency 2024
Solapur Lok Sabha 2024: 'सिद्धेश्वर'ची चिमणी, मोहिते पाटील, निष्क्रीय खासदार, पुन्हा मोदी! सोलापुरात स्वागत आहे..!

काहीजण म्हणतात लोकसभेला इकडे द्या विधानसभेला दादाला द्या. मात्र, लोकसभेला मलाच मतदान पाहिजे. कारण आपल्या भागात मोठ्या प्रमाणात केंद्रातून निधी आणायचा आहे. घड्याळ तुमचंच आहे, पक्ष कोणीही चोरला नाही. 80 टक्के आमदार त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिले आहे. आम्ही दरोडेखोर नाही, चोरटे नाही आम्ही काम करणारी माणसं आहोत,' असे अजित पवार म्हणाले.

"मला बारामतीबरोबरच संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे, तसा शब्द मी पुरंदरमधील सभेत दिला आहे. तुमच्या सर्व समस्यांवर मार्ग काढला आहे. सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज घड्याळाला आहे," असे आवाहन त्यांनी केले.

बारामतीत नणंद-भावजय अशी लढाई आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा, अशा संभ्रम बारामतीकरांमध्ये आहे. "ही निवडणूक भावनिक नाही. या ठिकाणी उपस्थित राहिलेले लोक मी आलोय म्हणून माझ्या सभेला आलेत. मी ज्याच्या विरोधात निवडणूक लढत आहे ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याही सभेला हे लोक जातात. दोन्ही डगरीवर हात ठेवू नका, असे अजितदादांनी उपस्थितांना सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com