पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पुण्याचे पालकमंत्री होतील, असे वृत्त सर्वात प्रथम `सरकारनामा`ने दिले होते. शिवाय सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी, असे म्हणतं मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही देवेंद्र फडणवीसांचे नाव फोडले. त्यावेळी फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेत आता राष्ट्रवादीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे स्पष्टपणे म्हंटले. त्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळतं आहे.
या निमित्ताने आता पुण्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस प्रथमच थेट लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि फडणवीस यांच्यात देखील थेटपणे सामना पाहायला मिळू शकतो. कारण पुणे जिल्ह्यातील भाजपच्या विस्तारवादी धोरणातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहेत ते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. ४ पैकी १ खासदार, २१ पैकी १० आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
अशातच आगामी काळात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका, पुणे जिल्हा परिषद, बारामतीसह सर्व नगरपरिषदा आणि सहकारातीलही बऱ्याच निवडणुका होणार आहेत. याच्या निमित्ताने राष्ट्रवादीला तगडे आव्हान देण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राहणार आहे. सोबत भाजपने बारामती लोकसभेमध्येही सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी आता पासूनच कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बारामती दौऱ्यावर येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे?
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील सोमवारी शिक्रापूर येथे आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यावर उत्तर देताना म्हणाले, राष्ट्रवादीचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळेच आता फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होवून राष्ट्रवादी काँग्रेसला थेट पुण्यातूनच आव्हान देण्याची चिन्ह आहेत. यातूनच अजित पवार-फडणवीस सामना होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.