Prakash Ambedkar News : वंचितमुळे चिंचवडमध्ये नाना काटेंचा पराभव? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टचं सांगितलं..

येत्या 11 मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रॉब्लम ऑफ रूपी या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama

Prakash Ambedkar News : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंचा पराभव झाला. वंचित आघाडीमुळे काटेंचा पराभव झाल्याचे सांगितलं जातंय. पण, वंचितमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. कसबा पोटनिवडणुकीतील विजय हा धंगेकरांचा विजय आहे. पक्षाचा आहे असं मी मानत नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे जर उभे राहिले नसते तर राहुल कलाटे निवडून आले असते. असं का तु्ही म्हणत नाही. असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे वंचितमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Prakash Ambedkar
Udhhav Thackeray : उद्धवजी, तुम्ही शंभर वेळा आलात तरी, खेडचा आमदार योगेश कदमच : सभेपूर्वीच कदमांनी डिवचलं!

तसेच, येत्या 11 मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रॉब्लम ऑफ रूपी या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित आम्ही काही खास कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. वाढती महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 100 वर्षांपूर्वीच हा प्रॉब्लेम या पुस्तकातून मांडला होता. आजही तोच प्रॉब्लेम आहे. पण रिझर्व्ह बॅंक आजही त्यावर ठोस उपाय योजना शोधू शकली नाही, अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com