मानाच्या गणपती मंडळांकडून दिलगिरी, कारण...

Ganesh Visarjan : पुण्यातील विसर्जन मिरवणूक यावेळी चर्चेची ठरली. मिरवणुकीला तब्बल ३१ तास लागले.
Pune Ganesh Visarjan
Pune Ganesh Visarjan sarkarnama

पुणे : विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Visarjan) मानाच्या गणपतींमुळे उशीर झाल्याची चर्चा झाल्यानंतर या विषयात मानाच्या गणपती मंडळांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मानाच्या गणपतंची मंडळाच्या मिरवणुकीला लागलेल्या विलंबाबद्दल आम्ही आत्मपरिक्षण करू. शहरातील इतर मंडळांना एकत्र करून यावर काहीतरी मार्ग काढू, असेही मंडळांच्यावतीने आज सांगण्यात आले.

Pune Ganesh Visarjan
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला मग महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्या फोडायच्या का ?

पुण्यातील विसर्जन मिरवणूक यावेळी चर्चेची ठरली. मिरवणुकीला तब्बल ३१ तास लागले. मानाच्या गणपती मंडळांमुळे मिरवणुकीला उशीर झाल्याचा ठपका साऱ्यांनीच ठेवला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीदेखील मानाच्या मंडळांमुळेच उशीर झाल्याचे सांगितले. यामुळे मानाच्या मंडळांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पाश्‍र्वभूमीवर मानाच्या गणपती मंडळांनी आज एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. मिरवणुकीला लागणारा वेळ कमी करण्यासाठी शहरातील इतर गणेशोत्सव मंडळे तसेच सर्व संबंधित घटकांना एकत्र करून काय उपाययोजना करता येतील, यावर विचार करण्यात येईल, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Pune Ganesh Visarjan
शिंदे-फडणवीस सरकारच्या उदासीनतेमुळे प्रकल्प गुजरातमध्ये; मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याची चर्चा

मानाच्या गणपती मंडळांच्याआधी विसर्जन मिरवणूक काढण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्याबद्दल उच्च न्यायालयाचे यावेळी आभार मानण्यात आले. याचिका फेटाळण्याचा न्यायालयाचा निर्णय हा पुणेकरांच्या श्रद्धेचा हा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीला मानाच्या गणपती मंडळांमुळे दरवर्षीच उशीर होतो, असे कारण देत या मंडळांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.

विसर्जन मिरवणुकीला मानाच्या गणपती मंडळांमुळे उशीर होत असल्याची भूमिका मांडत पुण्यातील बढाई समाज गणपती मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याआधी पोलीस आयुक्तांकडे मिरवणुकीची परवानगी मागितली होती का ? अशी विचारणा करीत न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com