बनवाबनवीमुळेच बाबाला भरणेमामांनी दोनदा चितपट केले : अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना एक इंड्रस्टी काढायाची होती. त्याकरिता जमीन आणि पैसे गोळा करण्यात आले. शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीने जमिनी दिल्या. तिथं आज कुसळाशिवाय काही दिसत नाही.
Ajit Pawar -Harshvardhan Patil
Ajit Pawar -Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर : पूर्वीच्या निवडणुकीत सूत गिरणी काढण्याची हूल दिली. निवडणुकीनंतर सूतगिरणीचं नावही काढलं गेलं नाही. त्यानंतर अशोक चव्हाण (Ashok chavan) मुख्यमंत्री असताना इंडस्ट्रीज काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीने जमीन दिल्या. पैसे गोळा करण्यात आले. पण, तिथं आज कुसळाशिवाय काही दिसत नाही. लोकांना किती बनवाल? अशा बनवाबनवीमुळेच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बाबाला दोनदा कधी चितपट केले, हे कळलंच नाही. ही बनवाबनवी केली नसती तर हे घडलं नसतं. आम्ही कधी बनवाबनवी करत नाही, त्यामुळेच सव्वा लाखाने निवडून येतो आणि हे मात्र इंदापुरात पडतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. (Deputy Chief Minister Ajit Pawar strongly criticizes Harshvardhan Patil)

हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राणी आढाव, युवक नेते दीपक जाधव, माजी सभापती स्वाती शेंडे, बापूराव शेंडे व त्यांच्या समर्थकांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar -Harshvardhan Patil
बंद पडलेल्या भीमा-पाटस कारखान्याबाबत अजितदादाचं मोठं विधान

अर्थमंत्री म्हणाले की, गणपतराव पाटील निवडणुकीला उभे होते, त्यावेळी सूत गिरणी काढण्याची हूल उठवली गेली. कोणत्या गावातील किती मुले कामावर घ्यायची, याच्या याद्या तयार करण्यात आल्या. मुलांनाही बरं वाटलं, तालुक्यात नवी संस्था होत आहे. पण, निवडून गेल्यानंतर सूत गिरणीचा कुठे पत्ताच नाही. कापूस कुठे?, सूत कुठे? आणि गिरणी कुठे? याचा काही थांगपत्ताच नाही. तसेच, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना एक इंड्रस्टी काढायाची होती. त्याकरिता जमीन आणि पैसे गोळा करण्यात आले. शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीने जमिनी दिल्या. तिथं आज कुसळाशिवाय काही दिसत नाही. अशा बनवाबनवीमुळेच दत्तामामांनी बाबाला दोनदा चितपट केले. दत्तात्रेय भरणेमामा आता चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना साथ द्या. आपण काम करताना जातीपातीचा विचार करत नाही.

Ajit Pawar -Harshvardhan Patil
जयंतराव, पवारसाहेब तुम्ही-आम्ही पाहुणे होऊ शकतो : जानकरांचा राष्ट्रवादीपुढे मैत्रीचा हात

हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे लोक या निर्णयापर्यंत का आले, याचेही चिंतन व्हायला पाहिजे. शिक्षणाच्या चांगली दालने श्रीमंत ढोले आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली आहेत. बारामतीचा कायापालट खऱ्या अर्थाने कधी झाला, तर विद्या नगरी १९९० मध्ये उभारली, शारदा संकुल, माळेगाव संकुल उभारले गेले. शिक्षणाच्या सुविधांमुळे तेथील परिस्थिती बदलली. नुसती शिक्षण संस्था काढून चालत नाही तर त्याचा दर्जा चांगला असावा लागतो. पुण्या-मुंबईला लाजवतील अशा सुविधा ढोले यांनी येथे उपब्लध करून दिल्या आहेत. म्हणूनच अल्पावधीत जय भवानी विकास प्रतिष्ठा नावारुपाला आलेला दिसून येते. ढोले कसे काम करतात, हे भरणे सांगायचे, ते आज प्रत्यक्ष अनुभवायला आले, अशा शब्दांत पवारांनी ढोले यांचे कौतुक केले.

Ajit Pawar -Harshvardhan Patil
दिल्लीत थोडा धक्का मारा, तुम्ही पंतप्रधान होऊ शकता : जानकरांची पवारांना सूचना

पालकमंत्री पवार म्हणाले की, राजीव गांधी सायन्स पार्क बारामतीत सुरू केले आहे. परिसरातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी जगात काय चालले हे पाहण्यासाठी तेथे एकदा जाऊन या. अधिकच्या सुविधा पाहिजे असतील तर त्याबाबत आम्हाला सांगा, त्या आम्ही करू. आता मसल आणि मनी पावर काही कामाचे राहिले नाही. आता नॉलेजची गरज आहे. ते असेल तरच आपण स्पर्धेत टिकू. राजकारणातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे मिळणाऱ्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपण विकास साधला पाहिजे. आपल्या भागात नाही, ते खेचून आणले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com