Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Pune : खंडणीखोर, वसुलीवाल्यांना ठेचून काढा अन्यथा...भर कार्यक्रमात फडणवीसांची पोलीस अधिकाऱ्यांना तंबी

Devendra Fadnavis : ''उद्योजकांना ब्लॅकमेलर त्रास देत आहेत त्यांना जेलमध्ये टाका''

Devendra Fadnavis : पुणे ही मनुष्यबळाची खाण आहे, त्यामुळे या ठिकाणी गुंतवणूकदार आकृष्ट होत आहेत. पण इथल्या गुन्हेगारीमुळे सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प कर्नाटकात गेला'', असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

''खंडणीखोर, वसुलीवाल्यांना ठेचून काढा अन्यथा तुमच्यावरच कारवाई केली जाईल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भर कार्यक्रमात ही तंबी दिली. पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात फोफावलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले, ''पुणे पोलीस (Pune Police), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), ग्रामीण पोलिसांची आज सकाळीच मी बैठक घेतली. आपल्याकडे उद्योजक यायला तयार झाले आहेत.

मात्र, त्यामध्ये उद्योजकांना, गुंतवणूकदारांना ब्लॅकमेलर त्रास देत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे, गटाचे, जातीचे, धर्माचे असेनात का? त्यांना सोडू नका. या सर्वांच्या मुसक्या बांधून त्यांना जेलमध्ये टाका'', अशा सूचनाच पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis
Fitness News : रावसाहेब दानवे राजकारणात हीट, तब्यतही फीट..

''आपल्याकडे उद्योगपती यायला तयार आहेत. पण खंडणीखोरांची इको सिस्टीम तयार झाली आहे. हे ब्लॅकमेलर उद्योगपतींना त्रास देत आहेत, पैसे मागत आहे. काही जणांकडे माथाडीचा परवाना नसतानाही ते वसुली करत आहेत. आम्हालाच कंत्राट मिळाली पाहिजे म्हणून दादागिरी करत आहेत. अशी मानसिकता असणाऱ्यांची कंबरडे मोडून काढणार आहोत.''

''आज दुपारी मला एक उद्योगपती भेटले. वर्षभरापूर्वी आम्ही सहा हजार कोटींची गुंतवणूक करायचे ठरवले होते. पण त्यानंतर आम्हाला धमक्या मिळाल्या, वसुलीसाठी संदेश पाठविण्यात आले. त्यामुळे आम्ही ६ हजार कोटींची गुंतवणूक कर्नाटकामध्ये नेली.

ही अवस्था आपल्याकडे होणार असेल तर भविष्यामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही. त्यामुळे काय वाटेल ते झाले तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच केली जाईल'', असे कडक आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Devendra Fadnavis
Lata Sonawane : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना अपात्रतेपासून दिलासा

''मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आपल्याकडे येत आहेत. पुणे जिल्हा हा मनुष्यबळाची खान असल्याने ते आपल्याकडे आकर्षित होत आहेत. इथे जर आपण औद्योगीक वातावरण चांगले ठेवू शकलो नाही तर ते कसे होतील''.

''उद्योगामध्ये राजकारण आणू नका, असे सर्व पक्षिय नेत्यांना आवाहन करतो. तसेच उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण झालेच पाहिजे. पण या कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वतःचे घर भरण्याचे काम करत असले तर सहन करणार नाही''.

''त्याच्यावरही कारवाई करणार. असा स्पष्ट संदेश या माध्यमातून गेला पाहिजे. जसे मुंबई आपले विकासाचे इंजिन आहे, तसे पुणे हे दुसरे इंजिन आहे. दुप्पट वेगाने व क्षमतेने हे धावले पाहिजे यासाठी राज्य सरकार लक्ष देईल'', असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com