Devendra Fadnavis News: अर्बन नक्षलवाद्यांचा कॉलेज- विद्यापीठांमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांचं मोठं भाष्य
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Pune News: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर नागरीक अभिवंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलवादी आता कॉलेज, विद्यापीठांमध्ये जाऊन देश, संस्कृती व संस्काराविरोधी विषाणू विद्यार्थी, तरुणांच्यात पसरवित आहेत, '' असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, "भारताबरोबर फक्त सीमेपलीकडील आतंकवादीच लढत नाही, तर त्यांचे काही साथीदार छुप्या पद्धतीने लढा देत आहेत. माओवाद्यांविरुद्ध लढताना अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. बंदुक घेऊन लढणाऱ्या माओवाद्यांना आता नवीन लोक मिळत नाहीत. पण अशा विचारांना प्रदूषीत करणाऱ्यांची संख्या वाढत आहे", असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
AAP News: महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी 'आप'चा मोठा निर्णय; तयार केला 'हा' मास्टर प्लॅन

"कॉलेज, विद्यापीठांमध्ये जाऊन देश, संस्कृती व संस्काराविरोधी विषाणू विद्यार्थी, तरुणांच्या मनात पसरविण्याचं काम काहीजण करतात. त्याद्वारे देश तोडण्याचे बीजारोपण ते करतात. मात्र, त्याविरुद्ध लढाई आता लढावी लागणार आहे", असा इशारा फडणवीसांनी दिला.

"भारत याआधी याचकाच्या भूमिकेत होता. पण आता भारत एक मजबूत देश म्हणून जगापुढे येत आहे. आमची ताकद एकीकडे वाढलेली असतानाच दुसरीकडे छुपेयुद्ध करण्याचा प्रकार सुरू आहे. भारताच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारील शत्रुराष्ट्रालाही चुकीचा विचार करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागत आहे ", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Nana Patole News : पटोलेंच्या विरोधातील तक्रारींची काँग्रेसश्रेष्ठी दखल घेणार?

"पण याच ताकदीमुळे भारताबरोबर एक छुपेयुद्ध लढले जात आहे. हे युद्ध फक्त सीमेपलीकडील आतंकवादी लढत नाहीत. तर त्यांचे काही साथीदार आपल्या देशात हे युद्ध लढत आहेत. शहरी नक्षलवाद्यांची विचारधारा विद्यार्थी, तरुणांच्या डोक्‍यात विषाणू निर्माण करण्याचे काम करत आहेत.

ते या व्यवस्थेविरुद्ध लढा देत असल्याचं चित्र निर्माण करत आहेत. प्रत्यक्षात कॉलेज आणि विद्यापीठांमधील तरुणाच्या डोक्‍यात व्यवस्था, संस्कृती व संस्कार याविरुद्ध बिजारोपण करण्यात येत आहे. पण राष्ट्रभावनेने प्रेरीत होण्यासाठी आत्मकेंद्री पिढी नको तर राष्ट्राचा विचार करणाऱ्या तरुणांची गरज असून तेच देशाला पुढे नेतील", असं फडणवीस म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com