Pune News : देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (एफडीआय) मध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागत आहे. रोजगार निर्मितीसाठीचे केंद्र म्हणून आता बँगलोर-दिल्ली यांच्या पुढे आता महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण भूमिकांमुळेच हे शक्य झाले आहे. विविध क्षेत्रात राबवण्यात येत असलेल्या विकासपूर्वक धोरणांमुळेच राज्याचा 2047 दोन ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. (Latest Marthi News)
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या 'विकसित भारत ॲम्बेसेडर-विकसित पुणे' कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी 2047 मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला. मागील पन्नास वर्षात ज्या वेगाने देशाची प्रगती व्हायला हवी होती ती झाली नाही. मात्र पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या दहा वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आज जगाच्या पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या अनेक ठोस भूमिकांमुळे हे शक्य झाले असून जगाचे नेतृत्व करणारा देश अशी आपली नवी ओळख निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर केंद्राच्या वतीने अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचा पायाभूत सुविधांवर आधारित शाश्वत विकास, औद्योगिक विकास, सामाजिक विकास आणि विकासाला पूरक सुरक्षेचे वातावरण या पाच पैलूंच्या आधारे 2047 पर्यंत महाराष्ट्राची दोन ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा वितरणाचा करार महाराष्ट्राने केला आहे. येत्या काळात राज्यात सोलर पार्क उभारण्यात येणार आहेत. शीतगृहांची संख्याही वाढविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात दररोज ९१ किलोमीटर लांबीचे रस्ते होत आहेत. याबरोबरच विविध शहरांना जोडण्यासाठी रस्त्यांचे मोठे जाळे देखील उभारले जात आहे. लवकरच पुणे ते संभाजीनगर हा नवा महामार्ग तयार करण्यात येत आहे. व्हाया नगर असा हा महामार्ग असणार आहे. हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. नागपूरहून पुण्यात सहा तासांत येणे शक्य होईल. त्यामुळे मी देखील पुण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मी जरी पुण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असलो तरी येथून निवडणूक (Election) मात्र लढणार नाही, नाहीतर उगाचच गैरसमज व्हायचा असे सांगण्यास देखील फडणवीस विसरले नाहीत.
देशातील सर्वोत्तम सायबर सुरक्षेची यंत्रणा महाराष्ट्रात उभी केली जात आहे. शिक्षण क्षेत्रावरही विशेष लक्ष केंद्रित करून नोकऱ्यांमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच भारत जगाच्या आर्थिक विकासाचे महत्वाचे केंद्र होत असतांना देशाच्या विकासाचे महाराष्ट्र हे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. देशात विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून देशान विमान निर्मिती होत आहे. पुण्यासाठी येत्या काळात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच होईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.