Pune Mahapalika : पुण्यात गणेश बिडकरांचा CCTV प्रोजेक्ट ठरला ट्रेंडसेटर : भाजपची सत्ता येताच संपूर्ण शहरात होणार अंमलबजावणी

पुणे महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरभर सीसीटीव्ही बसवून पुणे सेफ सिटी होणार असल्याची घोषणा केली असून गणेश बिडकरांच्या जुन्या प्रकल्पाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Chief Minister Devendra Fadnavis addressing a public meeting during Pune Municipal election campaign.
Chief Minister Devendra Fadnavis addressing a public meeting during Pune Municipal election campaign.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Mahapalika : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून पुणे हे सेफ सिटी होणार असल्याचं सांगितलं. फडणवीस यांच्या घोषणेनंतर तत्कालीन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी 4 वर्षांपूर्वी प्रभाग क्र. 24 मध्ये राबवलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची चर्चा होत आहे. या प्रकल्पाने आज आपली परिणामकारकता सिद्ध केल्याचे दिसून येत आहे.

गणेश बिडकर यांच्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्ययावत कंट्रोल रूमचे अनावरण झाले होते. त्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदारांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेली ही व्यवस्था आज ट्रेंडसेटर ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या प्रकल्पामुळे संबंधित प्रभाग अधिक सुरक्षित झाला असून गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात मोठी मदत झाली आहे.

समर्थ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकूण 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हॉस्पिटल, बसस्टँड, एटीएम केंद्रे, गर्दीची ठिकाणे, गणेश मंडळांचे परिसर यांना प्राधान्य देत सुमारे 60 ठिकाणी कॅमेरे उभारण्यात आले. 24 महत्त्वाचे चौक पूर्णपणे कव्हर झाले असून सुमारे 11 किलोमीटरचा परिसर सतत देखरेखीखाली आला. यामुळे संशयास्पद हालचालींवर तातडीने लक्ष ठेवणे, घटनांनंतर पुरावे मिळवणे आणि पोलिसांचा प्रतिसाद वेळ कमी करणे शक्य झाले.

विशेष म्हणजे पालखी सोहळा, गणेशोत्सव यांसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात या सीसीटीव्ही व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. वाहतूक कोंडी, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात कंट्रोल रूम महत्त्वाची ठरली. ही कंट्रोल रूम थेट पोलिस आयुक्तालयातील मुख्य कंट्रोल रूमशी जोडण्यात आल्यामुळे समन्वय अधिक सोपा झाला.

पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला होता. या योजनेच्या यशानंतर पुणे शहरातील इतर अनेक भागांमध्येही अशाच पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलिस विभाग आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विविध प्रभागांत ही सुरक्षा व्यवस्था विस्तारली गेली.

त्या काळात पुण्याचे पोलिस आयुक्त असलेले अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केलेली अशा प्रकल्पांची पुनरावृत्ती शहरभर व्हावी ही अपेक्षा आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेतील वक्तव्यानंतर गणेश बिडकर यांचा प्रकल्प ट्रेंडसेटर ठरल्याचे म्हटले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com