Chinchwad By Election : 'बिनविरोध'साठी आता देवेंद्र फडणवीसच मैदानात; महाविकास आघाडीला घालणार साकडं

Bjp Vs MVA Political News : यापूर्वी त्यांनी केलेली अशी विनंती आम्ही मान्य केली होती आता...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : आमदारांच्या निधनामुळे होत असलेली कसबापेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह, आम आदमी पक्ष, `एमआयएम`ने ही लढविण्याची घोषणा केल्याने ती बहूरंगी होण्याचीच दाट शक्यता आहे. तरीही ती बिनविरोध करण्यासाठी राज्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मैदानात उतरले आहेत.

भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर चिंचवड बिनविरोध करण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच सोपविली आहे. ते त्यासाठी आजपासून आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात करणार आहेत. त्यानंतर आता चिंचवडच नाही,तर कसब्याचीही निवडणूक बिनविरोध करण्याकरिता खुद्द देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मैदानात उतरल्यानं खरंच ती बिनविरोध होते का,हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं व्हिडीओ ट्वीट चर्चेत ; लेकीच्या 'त्या' प्रश्नावर लयभारी उत्तर देत जिंकलं मन

कसब्यासह चिंचवडचीही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांना विनंती करणार असून ती मान्य करायची की नाही,हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र,त्या बिनविरोध होणेच उचित राहील,असे फडणवीस म्हणाले. यापूर्वी त्यांनी केलेली अशी विनंती आम्ही मान्य केली होती,याकडे त्यांनी लक्ष वेधले.चिंचवडमध्ये उमेदवारीत कसलीही रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलं.

भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या इंद्रायणी थडी महोत्वाच्या उदघाटनासाठी काल रात्री ते भोसरीत आले होते.तेव्हा ते बोलत होते.महिलांना रोजगार देत त्याचवेळी ग्रामीण संस्कृतीचेही दर्शन घडवणाऱ्या या जत्रेच्या आयोजनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : "...म्हणून शिंदेंसोबत गेलेले कैलास पाटील गुजरात बोर्डरहून परत आले!''

दरम्यान,होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात महिलेला नक्की स्थान दिले जाईल,असे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे त्यात कोणाला स्थान मिळणार याची आता उत्सुकता आहे.सध्याच्या वीस जणांच्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबें(Satyajeet Tambe) ना पाठिंबा देणार का असे विचारले असता कॉंग्रेसने निलंबित केलेल्या व अपक्ष म्हणून लढणाऱ्या तांबेंनाच ते विचारा असे सांगत त्यांनी हे समर्थन तांबे यांनीच मागितले पाहिजे,असेच जणू काही सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com