Dhananjay Munde : मोठी बातमी ! अजितदादांनी धनंजय मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी

Ajit Pawar and Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा रविवारी पुण्यात 'युवा मिशन' मेळावा पार पडला.
Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar and Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष संघटना बांधणीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. अजितदादांनी सध्या सभा, मेळावे, बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा रविवारी पुण्यात 'युवा मिशन' मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आदी नेत्यांची उपस्थिती होती.

याच मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा प्रचार प्रमुखपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Dhananjay Munde
Sunetra Pawar Banner : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाई फेकली...सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया...

'मर्यादा सोडून बोलाल तर...'

या मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना इशारा देखील दिला. अजित पवार आणि आमच्या कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून बोललात तर आम्ही देखील सोडणार नाही. अजितदादांनी आम्हाला उभं केलं. त्यांच्यामुळे आम्ही आमदार झालो. आता सर्वात तरुण आमदार हे अजितदादांनीच निवडून आणले आहेत, असं मुंडेंनी म्हटलं. तसेच पक्ष आणि चिन्ह आता आपलं झालं आहे. त्यामुळे यापुढे फक्त अजित पर्व असेल, असं सूचक विधान देखील त्यांनी केलं.

'अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं...'

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलं असून 2024 साली आपल्याला त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे असणारे, अशा सर्वांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे काम करा. तेव्हाच 2024 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात केलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar : 'मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका, जरा...'; भर कार्यक्रमात अजितदादांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com