Pune BJP Executive : जुन्या नव्यांचा धीरज घाटेंनी घातला मेळ; ५० जणांची निवड करत बांधली मोट

Pune Political News : कार्यकारिणीतून पक्षांतर्गत विरोधकांना वगळले
Dheeraj Ghate
Dheeraj GhateSarkarnama

Pune Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकद टिकवून पक्ष वाढविण्यासाठी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दोन महिन्यांनंतर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यासाठी पक्षातील भली मोठी टीम उभी केली असून, त्यामध्ये महापालिकेतील कामांचा अनुभव असलेल्या जुन्या व नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडीतून घाटे यांनी जुने, नवे आणि तरुण तसेच अनुभवींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Political News)

Dheeraj Ghate
Special Parliament Session : विशेष अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी काँग्रेसचा काय आहे 'सुपर प्लॅन'?

भाजपकडून १९ जुलै रोजी राज्यातील ५३ जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष एकाचवेळी जाहीर केले होते. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी दोन महिन्यांनंतर कार्यकारिणी केली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील जवळपास ५० जणांची कार्यकारिणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सोमवारी जाहीर केली. यामध्ये ८ सरचिटणीस, १८ चिटणीस, १८ उपाध्यक्ष व विविध मोर्चाच्या अध्यक्षपदी ६ अशा ५० जणांची निवड केली आहे.

या कार्यकारिणीतून पक्षांतर्गत विरोधकांना वगळल्याचे दिसून येते. त्यासोबतच जुन्या कार्यकारिणीतील काही जणांचे प्रमोशन झाले आहे, तर काही जणांना नवी जबाबदारी दिली आहे. हे करीत असताना सर्वच आठ विधानसभा मतदारसंघांतील सर्वच भागातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न घाटे यांनी केला आहे.

नव्या कार्यकारिणीत घाटे यांनी जुने, नवे आणि तरुण तसेच अनुभवींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाज घटक आणि जातींचाही त्यात विचार केला आहे. या कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

अशी आहे कार्यकारिणी :

सरचिटणीस : वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, रवी साळगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे व महेश पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे\

चिटणीस : कुलदीप साबळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहुल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, खुशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे

उपाध्यक्ष : विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, मंजुषा नागपुरे, जीवन जाधव, सुनील पांडे, श्याम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे, संतोष खांदवे, महेंद्र गलांडे, रूपाली धाडवे, हरिदास चरवाड, गणेश कळमकर, प्रतीक देसारडा.

Dheeraj Ghate
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे देशाचे लक्ष; 'या' चार विधेयकांवर होणार निर्णय

युवा मोर्चा अध्यक्ष : करण मिसाळ

महिला मोर्चा अध्यक्ष : हर्षदा फरांदे

ओबीसी मोर्चा अध्यक्ष : नामदेव माळवदे

अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : भीमराव साठे

अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष : इम्तियाज मोमीन

व्यापारी आघाडी अध्यक्ष : उमेश शहा

(Edited by Sunil Dhumal)

Dheeraj Ghate
Thackeray Shinde Politics : शिंदे गटाला धाकधूक; अपात्र आमदार अन् पक्षाबाबत आज सुप्रीम सुनावणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com