Ajit Pawar On Rumours : आमदार बनसोडे, कोकाटेंची विधाने फुटीच्या चर्चेला खतपाणी घालणारी ठरली !

Anna Bansode : इतर पक्षातील सुरू केलेल्या चर्चांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी हवा दिली
Anna Bansode
Anna BansodeSarkarnama

NCP MLA Anna Bansode helps to Spread Rumours : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी स्वाभिमानातून केली आहे. त्यावेळेपासून पक्ष कधी सत्तेत होता कधी नव्हता. या चढउताराच्या काळात आम्ही सर्वांनी पक्षवाढीसाठी एकदिलाने काम केले. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे. मी पक्षात राहणार असून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. तसे आता अॅफिडेव्हीट करून देऊ का? असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Anna Bansode
Eknath Khadse : दादा मीडियाचे लाडके, त्यामुळेच झाली ‘मीडिया ट्रायल’

दरम्यान, आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर शिंदे गट, भाजपसह ठाकरे गटातील नेत्यांनीही त्यास दुजोरा देण्याचे काम केल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील महत्वाचे मानले जाणारे नेते खासदार संजय राऊत यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजप लोटस् ऑपरेशन २.० करीत असल्याचे वक्तव्य केले. राऊतांच्या या विधानामुळे तीन दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी अजित पवार राहिले. या चर्चेत इतर पक्षांचे नेते वेळोवेळी विविध विधाने करीत होतेच मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मागे नसल्याचे दिसून आले.

Anna Bansode
Ajit Pawar On Rumour : आता 'अॅफिडेव्हीट'वर लिहून देऊ का? माध्यमांतील चर्चांमुळे अजित पवार उद्विग्न

अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेच्या आगीत अजितदादांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांनी तेल ओतण्याचे काम केल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत आहे. यापूर्वीही अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचा अभिमान आहे, असे वक्तव्य बनसोडे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार जातील तिकडे मी जाणार असे विधान करून राजकीय वातावरण तापविण्याचे काम केल्याची टीका आता होत आहे.

आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्वांना माहिती आहे की मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. ते उद्या जो निर्णय घेतील तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे."

Anna Bansode
Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

दरम्यान, सोमवारी (ता. १७) माध्यमांशी बोलताना बनसोडे यांनी अजितदादांच्या भाजप प्रवेशाबाबत संदिग्ध विधान केले होते. ते म्हणाले होते की, "याबाबत तुम्हाला लवकरच एक गुडन्यूज समजेल." त्यांच्या या विधानामुळे भाजप प्रवेशाबाबत अजित पवार काहीतरी निर्णय घेणार आहेत की काय असे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.

त्यानंतर आज मंगळवारी (ता. १८) याबाबत आमदार बनसोडे यांनी असे काही सूचक वक्तव्य केले त्यामुळे पवारांच्या भाजप प्रवेश होणार, असे वातावरण निर्मिती झाली. बनसोडे म्हणाले, "अजित पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली नाही, पण आम्ही त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आलो  "अजितदादांसोबत किती आमदार आहेत माहिती नाही, पण ते साडेआकरापर्यंत स्पष्ट होईल. "

Anna Bansode
Atique Ahmed News : अतिकच्या खुनापूर्वी त्याच्या पत्नीने सीएम योगींना लिहिलेले पत्र आले पुढे : 'तुम्ही हस्तक्षेप न केल्यास माझी मुलं, पती, दीराचा...'

राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, "अजित पवारांकडे काम करण्याची जी हतोटी आहे ती कुणाकडेही नाही. त्यामुळे आताच्या घडीला टार्गेट करण्यासाठी तेच एक नेते आहे. ते जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र दादा राष्ट्रवादीव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा विचार करणार नाहीत. मात्र ते भाजपमध्ये गेल्यास आम्हीही त्यांच्यासोबत असणार आहोत. दरम्यान हे सरकार काही पडणार नाही."

दरम्यान, भाजपमध्ये जाण्याच्या फक्त अफवा आहेत. या चर्चांमुळे माझ्यासह सरकारी आमदार आणि कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट असतानाही, त्याबाबत पक्षातील वरिष्ठानी कसलीही चर्चा केली नसताना आमदार बनसोडे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांनी संभ्रम वाढविल्याचे म्हटले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com