राजगुरुनगर: असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा विकास हा मुद्दा स्थानिक जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मला स्वतःसाठी काही करायचे नसून, सर्व आयुष्य तालुक्यातील समाजकार्यासाठी आहे. त्यात आळंदीच्या विकासास प्राधान्य राहील, असे प्रतिपादन खेड-आळंदी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
दिलीप मोहिते पाटील यांच्या आळंदी येथील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. महायुतीमधील सर्व घटक पक्ष त्यांच्या प्रचारात उत्साहाने सामील झाले होते. मोहिते यांच्या प्रचारासाठी सोमवारी आळंदीमधून प्रचार फेरी काढण्यात आली.
आळंदी शहरातील चाकण चौक, गोपाळपुरा, केळगाव रस्ता ते घुंडरे आळी, गोदी धर्मशाळा, अण्णा भाऊ साठेनगर, पद्मावती रस्ता, चाळीसफुटी रस्ता, वडगाव रस्ता, राम मंदिर, रॉयल गंगा, ज्ञान दर्शन चौक, के. के. हॉस्पिटल मार्ग, भैरवनाथ मंदिर,
संतोषी माता मंदिर, तुळजा भवानी माता, मरकळ चौक, सोपान जाई पार्क, रावडे गल्ली, चावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाद्वार चौक, नगरपरिषद चौक, भाजी बाजार, नगरपरिषद परिसरात प्रचार रॅली करण्यात आली.
आळंदी शहरात झालेल्या विकासकामांमुळे नागरिक समाधानी असून, त्यांनी चौकाचौकात फटाके वाजवून मोहिते यांचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक व्यापाऱ्यांनी मोहिते यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना समर्थन दर्शवले. प्रचारफेरीत सहभागी युवकांची संख्या लक्षणीय होती.
राम गावडे, अरुण चौधरी, अशोक उंबरेकर, प्रकाश कुऱ्हाडे, राजाराम लोखंडे, डी. डी. भोसले, रामदास भोसले, कमल कड, संध्या जाधव, किरण येळवंडे, सदाशिव कांबळे, विमल ठाकूर, प्रताप ठाकूर, कैलास थोरवे, पांडुरंग वहिले, नितीन घुंडरे, पारूबाई तापकीर, संगीता फपाळ, संदेश तापकीर, राजाभाऊ गावडे, अशोक कुऱ्हाडे, अमोल वीरकर, गणेश ठाकूर, समीर कुऱ्हाडे आदी प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.