Pune News : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरून पडल्याने हात पाय आणि खुब्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने वळसे-पाटलांच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी वळसे-पाटलांशी फोनवरून संवाद साधला.
वळसे-पाटलांवर शस्त्रक्रियावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या हॉस्पिटलमध्ये उपस्थित होत्या. या वेळी जुपिटर हॉस्पिटलमध्ये दिलीप वळसे-पाटीलांवरील दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या करण्यात आलेल्या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ( Dilip Walse Patil News )
दरम्यान, वळसे पाटील बुधवारी रात्री पुण्यातील घरात पाय घसरून पडले होते. यात त्यांच्या खुब्याला दुखापत झाली होती. त्यासोबतच त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. दरम्यान, काही वर्षांपूर्वी वळसे पाटलांच्या याच हाताला मार लागला होता. आता पडल्याने त्यांचा तोच हात पुन्हा फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत वळसे पाटलांनी (Dilip walse Patil) ट्विट करून माहिती दिली होती. ते म्हणाले, बुधवारी रात्री घरात पडल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
R