Dilip Walse-Patil on Maharashtra Politics: 'नक्की आपले कोण आहेत, याची माहिती आपल्याला पाहिजे..; दिलीप वळसे-पाटील असं का म्हणाले...

Maharashtra Politics: रोज सकाळी एकमेकांची आब्रु काढणारे सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलत नाहीत.
Dilip Walse-Patil on Maharashtra Politics:
Dilip Walse-Patil on Maharashtra Politics: Sarkarnama

Dilip Walse Patil Criticized Shinde, Rane And Raut: दिवसाची सुरुवात करताना सकाळी टीव्ही लावला की एका बाजूने खासदार संजय राऊत तर दुस-या बाजुला आमदार नितेश राणे त्यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांची आब्रुच काढताना दिसतात. अशी टीका करत माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी राऊतांसह राणे फडणवीसांना खडेबोल सुनावलं.

रोज सकाळी एकमेकांची आब्रु काढणारे सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलत नाहीत. एकमेकांच्या आब्रु काढण्यापलीकडे काहीच करत नाही. यातुन सामान्य जनतेचे कल्याण काय होणार असा खडा सवालच वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) भर सभेत मांडला. त्यांच्या या मुद्द्याला उपस्थितांनीही दुजोरा दिला.वळसेपाटील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील दौ-यावर असताना सभेतून बोलत होते.

Dilip Walse-Patil on Maharashtra Politics:
Warkari Police Clash : वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने केला? काँग्रेसचा संतप्त सवाल

राज्यात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरु आहे. अहमदनगरमध्ये कुठेतरी जुलूस निघतो आणि त्यात औरंगजेबाचा फोटो दाखवला जातो. त्याच औरंगाबादला दंगल होते. कोल्हापूरला दंगली होतात. मी गृहमंत्री असताना बांग्लादेशात काहीतरी झालं तर आपल्याकडे मालेगाव, अमरावतीत दंगली झाल्या पण आपण तेव्हा ते फारसं वाढू दिलं नाही. जर औरंग्याच्या फोटोचे स्टेटस ठेवल्याच्या छोट्या गोष्टींनी दंगली व्हायला लागल्या अन त्या दंगलीला सरकारचे संरक्षण मिळत आहे. असा गंभीर आरोप वळसेपाटीलांनी केला. त्यामुळे आज महाराष्ट्रात काय चाललंय याची माहिती घेतली पाहिजे. यातून नक्की आपले कोण आणि लाभाच्या हेतूने आपल्याकडे आलेले कोण हे आपल्याला कळायला पाहिजे. (Maharashtra Politics)

लव जिहाद च्या नावाखाली हिंदु विरुद्ध मुसलमान, दलित विरुद्ध इतर असे वाद सुरू करून आपल्याच लोकांमध्ये फूट पडण्याचे कारस्थान सुरू आहे. प्रेम विवाहतुन हिंदु मुस्लिम मुलां मुलीचे विवाह होतात यामध्ये वय मर्यादा योग्य असेल तर तक्रार असण्याचे कारण नाही. पण जबरदस्ती धर्मांत्तर करायला लावल्याच्या तक्रारी आल्या की वाद होतोच त्यातून तेढ निर्माण होते, असंही वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. (Political News)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com