Dipti Chaudhari Death: महत्वाची घडामोड! फरार सासरा, दीर किती दिवस पळणार? पोलिसांनी लावला सापळा; कोर्टाचा पती, सासुला दणका

Dipti Chaudhari Death: दिप्ती चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांत हुंडाबळी, शारीरिक छळ तसेच स्त्रीभ्रूणहत्या अशा गंभीर गुन्ह्यासाठी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
Pune Crime Dipti magar suicide case
Pune Crime Dipti magar suicide case Sarkarnama
Published on
Updated on

सुनील जगताप, सकाळ वृत्तसेवा

Dipti Magar Chaudhari Death: नातू हवा म्हणून सुनेचा गर्भपात घडवून आणणाऱ्या आणि हुंड्यासाठी शारिरीक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोरतापवाडीच्या (उरुळी कांचन) सरपंच सुनिता चौधरी यांच्यासह मुलगा रोहन चौधरी याला रविवार (दि. २६) पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना ३१ जानेवारीपर्यंत ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर मृत दीप्तीचा दीर आणि सासरा मात्र अद्यापही फरार आहेत.

Pune Crime Dipti magar suicide case
Bihar Bhavan: एकीकडं सरकारी दवाखान्यांची दुरावस्था अन् दुसरीकडं 314 कोटींचं 'बिहार भवन'; व्यंगचित्रातून मनसेचा हल्लाबोल

सासरच्या मंडळींकडून सततच्या पैशांची मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून सोरतापवाडी येथील विवाहिता दिप्ती रोहन चौधरी यांनी शनिवार (दि.२५) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर, फरार झालेली सासू तथा सोरतापवाडीच्या सरपंच सुनिता चौधरी, पती रोहन कारभारी चौधरी यांना पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी रविवारी (दि.२६) सकाळी अटक केली. या प्रकरणात सासू सुनिता चौधरी या मुख्य आरोपी असून सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित चौधरी हे अद्याप फरार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांचे एक व उरुळी कांचन पोलिसांचे एक अशी दोन स्वतंत्र पथकं आरोपींच्या मागावर आहेत.

Pune Crime Dipti magar suicide case
Pune Mayor Selection: अखेर ठरलं! पुण्याचा महापौर 'या' दिवशी होणार जाहीर; नेमकी काय चाललीत खलबतं?

दिप्ती चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांत हुंडाबळी, शारीरिक छळ तसेच स्त्रीभ्रूणहत्या अशा गंभीर गुन्ह्यासाठी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. उरुळी कांचन पोलिसांनी या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दिप्ती चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी परिसरात तसेच समाजात संतप्त भावना पसरल्या आहेत. आरोपी हे गर्भ श्रीमंत असताना व सुशिक्षित कुटुंबात असताना दिप्तीला अडीच वर्षांच्या मुलीला मागे सोडून मृत्यूस कवटाळावे लागल्याने संतापाचा उद्रेक वाढला आहे. या गुन्ह्यात गर्भपात झाल्याने गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना संबंधीत गर्भलिंग निदानाचे रॅकेट शोधून संबंधीत रुग्णालयावर व व्यावसायिकांची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com