पोलिसांच्या नाकावर टिच्चून केला संचालकाचा सत्कार : ठाण्यासमोरच जमावबंदीला आव्हान

दौंडमध्ये साखर कारखान्याच्या संचालकाचा सत्कार; कोरोना निमयमांचे उल्लंघन
Daund
Daundsarkarnama
Published on
Updated on

दौंड (जि. पुणे) : जमावबंदीचा आदेश असताना दौंड (Daund) पोलिस ठाण्यासमोरच सर्व निर्बंध झुगारून नगर जिल्ह्यातील शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याच्या एका नूतन संचालकाचा सत्काराचा कार्यक्रम जल्लोषात करण्यात आला. कोरोनाचा (corona) वाढता संसर्ग रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचा आदेश असताना त्याला खुद्द पोलिस ठाण्यासमोरच आव्हान देण्यात आले आहे. (Director of Sugar Factory felicitated in Daund; Violation of corona rules)

श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत बंडू जगताप हे संचालकपदी निवडून आले आहेत. त्या निमित्त दौंड पोलिस ठाण्यासमोर त्यांच्या मित्रपरिवाराने सोमवारी (ता. १७ जानेवारी) सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. ढोल-ताशांचा निनाद व फटाक्यांची आतषबाजीत अगदी खुर्च्या टेबल मांडून जगताप यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. सत्कारास दौंड नगरपालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. शिवाय कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती. या यापैकी कुणीही तोंडावर मास्कचा वापर केलेला नव्हता.

Daund
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

संध्याकाळी सहा वाजता याच ठिकाणी दौंड पोलिसांचे २ अधिकारी व १० कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासानंतर पोलिसांना ढोल-ताशांचा आणि फटाक्यांचा आवाज ऐकू न आल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणारे मात्र पुढाऱ्यांच्या कार्यक्रमांना मूक संमती देत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. कार्यक्रमावर साधी हरकत देखील न घेता दौंड पोलिसांनी ` सद् रक्षणाय खल निग्रहणाय ` या महाराष्ट्र पोलिस दलाच्या बोधवाक्याच्या विरूध्द कृती केली आहे.

Daund
रिक्षातून SP ऑफिसमध्ये पोचला अन्‌ म्हणाला ‘मी विशाल फटे...’ : पोलिसांनीच ओळखले नाही!

दौंड पोलिस ठाण्यासमोर व परिसरात विना परवानगी सार्वजिनक कार्यक्रम घेण्याचे पेव फुटलेले आहे व त्याला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत आहे. या कार्यक्रमांना नगरपालिका किंवा पोलिसांची परवानगी तर नसतेच परंतु अत्यंत वर्दळीचे मुख्य रस्ता व जोड रस्ते कार्यक्रमाच्या अगोदर पडदे लावून बंद केल्याने नागरिकांचे मात्र हाल होतात. पोलिस ठाण्याकडे व पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने बेशिस्तपणे लावली जातात. मुख्य रस्त्यावर दुतर्फा रिक्षावाले रस्ता अडवितात मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिस धजावत नाही. कारवाई होणार नाही आणि झाली तर पंटरांच्या मदतीने तासाभरात वाहन पुन्हा ताब्यात मिळते, अशी सद्यस्थिती आहे.

Daund
अजित पवारांनी बोट नाही ठेवले...पण दुर्गाडे थोरातांना जाऊन भेटले...!

दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या निर्देशानंतर १८ जानेवारी रोजी दुपारी पोलिस नाईक अण्णासाहेब देशमुख यांनी निर्बंध झुगारून झालेल्या सत्कार प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांच्याविरूध्द कोणतीही परवानगी न घेता जाहीर सत्कार कार्यक्रम घेऊन गर्दी जमविल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १८८ (जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवज्ञा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com