Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News :Sarkarnama

Pimpri Chinchwad Politics : लागोपाठ बूथ नंबर असलेल्या तीन तालुक्यातील नव्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्काराची चर्चा!

Pimpri Chinchwad Politics : सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांची गैरहजेरी यावेळी खटकून गेली.
Published on

Pimpri Chinchwad News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रखडलेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या १९ जुलै रोजी केल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी एक अधिकचा असे चार जिल्हाध्यक्ष देण्याची खेळी आगामी लोकसभा लक्षात घेऊन पक्षाने केली. त्यातील दोघांसह आणि पक्षाच्या किसान मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे अशा तिघांचा बुधवारी (ता.२६) पुण्यात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

या सत्काराचे वेगळेपण म्हणजे या तिन्ही सत्कारार्थींत काही साम्ये आहेत. ते जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. त्यांचा निवडणुकीतील बूथ हे एकामागोमाग एक नंबरचे आहेत. म्हणजे वासुदेवनानांचा दौंडमधील बूथ क्रमांक 237 असून तो बुट्टेंचा खेड तालुक्यात 238 आहे. तर, भेगडेंचा मावळ तालुक्यातील त्याचा क्रमांक 239 आहे.

Pimpri Chinchwad News :
EC Notice To Sharad Pawar: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस; आता पवार काय भूमिका घेणार ?

वासुदेवनाना आणि बुट्टे हे अगदी तरुण वयात २६ व्या वर्षी जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्याच वर्षी बुट्टे कृषी, पशुसंवर्धन सभापती झाले. गणेशतात्या वयाच्या २९ व्या वर्षी नगरपरिषदेमध्ये निवडून गेले होते.अशा रितीने तिघांनाही कमी वयात लोकप्रतिनिधीं होण्याची संधी मिळालेली आहे.ही साम्यस्थळे बुट्टेंनी भाषणात सांगताच उपस्थितांत हशा पिकला.

Pimpri Chinchwad News :
Pune Politics : पुण्याचे पालकमंत्री दादाच; फक्त चंद्रकांतदादांऐवजी जबाबदारी अजितदादांना मिळणार?

शहरातील या सत्कार सोहळ्यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस अविनाश बवरे, सुदर्शन चौधरी आणि अविनाश मोटे यांनीही दिलखुलास भाषण करून टाळ्या घेतल्या. मात्र, चौथे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांची गैरहजेरी यावेळी खटकून गेली.

दरम्यान, तिन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात या घरच्या सत्काराबद्दल जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच पक्षात अशाप्रकारे कौटुंबिक आणि स्नेहाचे वातावरण असले पाहिजे, अशी अपेक्षा तथा इच्छा व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com