पुणे स्टेशनने घेतला मोकळा श्वास; बॉम्ब सदृश्य फटाक्याची पोलिसांकडून विल्हेवाट

Pune Railway Station news| पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांडया आढळून आल्याची माहिती समोर आली होती.
Pune Railway Station  news
Pune Railway Station news
Published on
Updated on

Pune Railway Station news

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनमध्ये आज (१३ मे) बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांडया आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. आता या बॉम्ब सदृश्य वस्तूची पोलिसांनी विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली आहे. मोकळ्या मैदानात जाऊन बॉम्ब सदृश्य वस्तूची पोलिसांनी पाहणी केली. पहाडी केल्यानंतर त्या वस्तूची विल्हेवाट लावण्यात आली.

स्टेशनमध्ये स्फोटक वस्तू आढळताच नागरिकांना त्या परिसरापासून दूर पाठवण्यात आले. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) आणि बॉम्ब नाशक पथक, डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकातील संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामं करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि बीडीडीएस (BDDS) पथकाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर तब्बल तासाभरानंतर वाहतुक पुन्हा सुरळीत झाली.

Pune Railway Station  news
पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ! तासाभरानंतर वाहतूक सुरळित

त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील सीसीटीव्ही फुटेज सध्या पोलिस तपासात आहेत. कोणतीही वस्तू कोणी ठेवली याचा तपास पोलीस घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी चा फोन देखील आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वाघोलीतून दोघांना अटक केली होती.

बॉम्ब कुठे ठेवलाय, याची माहिती हवी असेल, तर सात कोटी रुपये द्या, अन्यथा पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा कॉल पोलिसांना आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तातडीनं तपास यंत्रणा कामाला लावली. अखेर याप्रकरणी वाघोलीतून दोघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com