आमदार जगतांपांनी कुलूप तोडले अन् हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा लावले!

काँग्रेसच्या कार्यालयावरुन आमदार जगताप आणि हर्षवर्धन पाटील आमने-सामने.
 Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
Harshvardhan Patil, Sanjay Jagtapsarkarnama
Published on
Updated on

बारामती : इंदापूरमध्ये काँग्रेस (Congress) भवनावरुन वाद रंगला आहे. काँग्रेसचे तत्कालीन नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इंदापूर येथील काँग्रेसचे भवन अनेक वर्ष बंद होते. या बंद काँग्रेस भवनचे कुलूप पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी तोडले. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

प्रजासत्ताकदिनानिमित्त काँग्रेस भवनचे कुलूप तोडून जगताप यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी हे भवन काँग्रेसचे आमचेच असल्याचा दावा केला. त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही मालमत्ता ट्रस्टची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये आता काँग्रेस भवनावरुन जगताप आणि पाटील आमने-सामने आले आहेत.

 Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
मोदी-शहा 2024 ला घरी जाऊ शकतात... पण काॅंग्रेसने अशी तयारी दाखवली तर!

कुलूप तोडून भवनामध्ये प्रवेश केला त्यावेळी जगताप म्हणाले, हे जे कार्यालय माजी मंत्री शंकररावजी पाटील यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षासाठी बांधले होते. २०१९ ला या कार्यालयाची नोंदणी इंदापूर काँग्रेस स्ट्रस्ट नावाने केली आहे. २०१५ ला हे ट्रस्ट उभे राहिले आहे. याची केस आम्ही महसूल विभागात लढलो आहोत. महसूल विभागाने आमच्या बाजूने निकाल दिला. हे भवन काँग्रेस पक्षाचे आहे. शंकररावजी भाऊ यांच्या माध्यमातून हे भवन उभे राहिले आहे. हे काँग्रेस पक्षाचे भवन आहे, मात्र, अनधिकृत पणे या भवनला कुलूप ठोकले होते. या भवनाचे नुतनीकरण आम्ही लवकरच करु, इंदापूरच्या जनतेसाठी हे कार्यालय सुरु करु असे, आमदार जगताप यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ही मालमत्ता सार्वजनिक असून याचा कुठलाही वाद नाही. ही जागा ट्रस्टची असून इंदापूर तालुक्याच्या जनतेसाठी आहे, असा प्रतिदावा त्यांनी केला. यामुळे इंदापुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी तणाव निवळत हा न्यायालयीन लढा असल्याचे सांगितले. भवना संदर्भातील वाद हा न्यायालयामध्ये आहे. हे कार्यालय आहे ते 'अध्यक्ष काँग्रेस इंदापूर तालूका' असे आहे. हे कार्यालय अनेक वर्षापूसनचे आहे. ते तालूक्यातील जनतेसाठी आहे. काँग्रेस आयचा आणि कार्यालयाचा काहीच संबंध नाही, असे पाटील म्हणाले. न्यायालयात जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल.

 Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
ते सरकारी कार्यालय, कुणाच्या बापाचं नाही : फडणविसांनी सुनावले

ही जागा आमच्या ताब्यात आहे. येथे आम्ही ट्रस्ट स्थापन केला आहे. त्यावर जर कोणी वाद निर्माण केला तर तो निर्णय न्यायालयात होईल. अनेक वर्षापासून या जागेचा कर आम्हीच भरत आहोत. कोणाला वाटत असले की ती जागा त्यांची आहे तर त्यांनी न्यायालयात सिद्ध करावे, असे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी आम्हाला बोलावले होते. येथे आमचा ताबा आहे, त्यांनी कुलूप तोडले होते. आम्ही परत कुलूप लावले आहे. जगताप यांना कोणितरी चुकीची माहिती दिली असले त्यामुळे ते आले, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com