Congress - Shiv Sena over Savarkar: सावरकरांवरून काँग्रेस-शिवसेनेत बिघाडी; आघाडीच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार !

Savarkar Controversy: सावरकरांच्या अपमानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray, Rahul Gandhi
Uddhav Thackeray, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : काँग्रेस नेते व माजी खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभेवेळी मोदी आडनावरून केलेल्या विधानामुळे ओबीसी समाजाची व परदेशातील विधानावरून देशाची माफी मागावी, अशी जोरदार मागणी भाजपकडून केली जात होती. मात्र माफी मागायला मी सावरकर नाही, अशी भूमिका घेत राहुल गांधींनी माफी मगायला नकार दिला. सावरकरांच्या अपमानावरून भाजपसह आता शिवसेनाही (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीला आमच्या पक्षाचा एकही नेता उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सावकरांवरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत वितुष्ट येण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

Uddhav Thackeray, Rahul Gandhi
Gulabrao Patil's On Sanjay Raut: ..नाहीतर तोच कांदा हाणून मारीन; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले, 'आधी मत परत..

दरम्यान, नीरव मोदी आणि ललीत मोदींवर केलेली टीका ही 'ओबीसीं'चा अपमान नाही, तसेच देशातील आहे ती स्थिती सांगितली तर भारताची प्रतिमा कशी डागाळेल, असे म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागण्यास नकार दिला. मात्र दोन्ही प्रकरणी राहुल यांनी माफी मागितली तर प्रकरणावर पडदा पडेल, अशी मागणी केली जात आहे. यावर राहुल गांधींनी माफी मागायला मी सावकर नाही, असे दोन वेळा म्हणत भाजपची मागणी धुडकावून लावली.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी 'सावरकर समझा क्या... नाम- राहुल गांधी है', असे वाक्य ट्वीट करून भाजपवर हल्ला केला होता. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही सावकरांचा उल्लेख करून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी माफी मागायला मी काय सावरकार आहे का? गांधी आहे. गांधी कधीच माफी मागत नाही, असा पुरुच्चार केला होता.

Uddhav Thackeray, Rahul Gandhi
Rahul Gandhi News: राहुल गांधींवरील कारवाईमुळे विरोधक एकवटले; बैठकीला तृणमूलची हजेरी; सिन्हांनी मानले पंतप्रधानांचे आभार

स्वातंत्र्यवीर सावकर (Savarkar) यांचा राहुल गांधी वारंवार आपमान करीत आहेत, त्यामुळे देशभरात भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान, सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) केली जात आहे. भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी बनविली आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांचे सावकर यांच्याबद्दल अगदी विरुद्ध मते आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या सावकरांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नाशिमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी सावरकरांच्या होत असलेल्या आपमानावरून त्यांनी राहुल यांना इशाराच दिला.

Uddhav Thackeray, Rahul Gandhi
Amol Mitkari Vs Gopichand Padalkar: ''शरद पवारांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या...''; मिटकरींचा पडळकरांवर घणाघात

उद्धव ठाकरे म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापि सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १४ वर्षे छळ सोसला, मरण यातना सोसल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले ते कुणाचेही काम नाही. आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आलो आहोत, लोकशाही टिकविण्यासाठी आपण लढत आहोत. त्याला फाटे फोडू नका." तत्पुर्वी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सावरकरांचा आपमान सहन करणार नाही. सावरकरांबद्दल आदराने बोला, असे राहुल गांधींना उद्देशून म्हणाले होते.

Uddhav Thackeray, Rahul Gandhi
Parinay Fuke News : वाळुमुळे अडलेली घरकुले आता होतील पूर्ण, परिणय फुकेंचा पाठपुरावा !

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी जास्त काळ टिकणार नाही, असे भाकित केले होते. ते म्हणाले की, "आता विधानसभा येणार आहे. त्यावेळी जागा वाटप करताना महाविकास आघाडीचे काही सांगता येणार नाही. एका पक्षाला उमेदवारी दिल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे इच्छुक, दावेदार भजन करत बसणार नाहीत." त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास राहुल गांधींचे सावरकर यांच्यावरील वक्तव्य निमित्त ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com