Ajit Pawar : एकमेकाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिणवण्याचं काम करू नका रे बाबा !

अशा प्रकारे विकृत मनोवृत्ती असणारे लोक किंवा देशद्रोही विचारांच्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार आज म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

बारामती : आपल्या देशात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे लोक, असं धाडस कसं काय करू शकतात, याचा विचार पहिल्यांदा राज्यकर्त्यांनी करावा. अशा प्रकारे विकृत मनोवृत्ती असणारे लोक किंवा देशद्रोही विचारांच्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार आज म्हणाले.

अजित दादा (Ajit Pawar) आज पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी आज खर तर बारामती (Baramati) आणि इंदापूर परिसरामध्ये असल्यामुळे मला अधिकची माहिती नाही. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या व्हायरल झालेल्या फोटोबद्दल बोलताना ते म्हणाले, सध्या अतिशय खालच्या स्तरावरच राजकारण चालू आहे. हे मी इंदापूरकरांना आता सांगत होतो. ही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही. हे असले प्रकार बंद करा. सर्वच पक्षांनी बंद करा. याच्यातून आपण कुणाचंही काहीही साध्य करत नाही. ज्यांचं राज्य आहे हे त्यांनी करा. मात्र एकमेकाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिणवण्याच काम करू नका.

हे आपल्याला कुणी शिकवलेलं नाही. अशा प्रकारचे नवीन पायंडे पाडू पण नका आणि जर कुणाच्या चुका घडत असतील तर त्यांना त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना सांगून हे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. काहींना ऐकायचं नसेल तर त्यावर रीतसर कारवाई करावी. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दल विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री कोणीही जरी असले तरी ते दिल्लीला गेल्यावर काही कामांसाठी पंतप्रधानांना भेटावं लागतं किंवा गृहमंत्र्यांना भेटावं लागतं. त्यामध्ये नितीन गडकरी असतील अर्थमंत्री असतील, यांना भेटावंच लागतं. ज्या डिपार्टमेटचं काम असतं त्यांना त्यांना भेटावं लागतं. त्यांच्या भेटीबद्दल फार काही बोलण्याची गरज नही.

शिवसेना निकालाच्या बाबतीत विचारले असता, हे होणार की नाही याबद्दल तुम्हालाही खात्री नाही आणि मलाही खात्री नाही. कारण हे बरेच दिवस हा खेळ चाललेला आहे. सतत तारखा पुढच्या पुढच्या पुढच्या पडतात आहेत. आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता जे खंडपीठ निर्माण केलं आहे, अन् लोकशाहीचा मुद्दा पुढे आलेला आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. ते विचार करतील. पण याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जावा.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित दादा म्हणाले सत्ताधाऱ्यांना, हे वागणं बरं नव्हं..!

शिवाजी पार्कवरून जो खेळ चाललेला आहे, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, हा रडीचा डाव आहे आहे. उद्धव ठाकरेंना काय विचार मांडायचे ते मांडू द्या. दुसऱ्या ग्राऊंडवर एकनाथराव शिंदे यांना काय विचार मांडायचे ते मांडू द्या. ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, त्यांना त्यांची रणनीती आखू द्या. आम्ही पण आमची रणनीती आखण्याच्या करता कॅपेबल आहोत. त्याच्या संदर्भात काही काळजी करण्याचं कारण नाही. दोघांनी कितीही रणनीती आखली तरी बारामती मतदार संघाचा मतदार सजग आहे. मला तीस बत्तीस वर्षांचा अनुभव आहे. इतर बाबींवरही लक्ष द्या, यावर मतदार बटण दाबण्याचे काम करतील, याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.

हर्षवर्धन पाटील यांच्या टीकेवर बोलताना हे पैसे आज येत नाहीत. तुम्हाला आठवत असेल. ७३ वी आणि ७४ वी घटना लिहिली, ती दुरुस्त करावी लागली. त्या वेळेपासून हा नीट पैसा यायला लागला. काही काही लोक पूर्वीच्या गोष्टी विसरून जातात. दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर विश्वास निर्माण करण्याकरता अशा काहीतरी वल्गना करता. याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर निश्चित प्रकारे आघाडी होऊ शकते, असे ते महाविकास आघाडीबद्दल बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com