Amol Kolhe Resignation : डॉ. अमोल कोल्हे राजीनामा देणार? शरद पवारांची भेट घेऊन..

Will Amol Kolhe Resign : "मी शरद पवारांसोबत..."
Amol Kolhe Resignation
Amol Kolhe ResignationSarkarnama
Published on
Updated on

NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (AJit Pawar) यांनी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) साथ सोडत, शिंदे- फडणवीस यांच्या युती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपण शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचे स्पष्ट केले. आता ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. (Latest Marathi News)

Amol Kolhe Resignation
शहाजी पाटलांचा २४ तासांत 'यू टर्न' : शिवसेना, उद्धव ठाकरेंमुळेच आमदार झालो!

खासदार कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र या सोहळ्यानंतर त्यांनी आपल्याला शपथविधीची काही कल्पना नव्हती, वेगळं कार्यक्रम आहे म्हणून इथे बोलवण्यात आलं. मात्र आपण नेहमी शरद पवारांसोबत आहोत, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले होते. अशा आशयाची सोशल मीडियावरही त्यांनी पोस्ट लिहीली होती.

Amol Kolhe Resignation
Dilip Mohite Patil On Ajit Pawar : अजितदादांबाबत आमदार मोहितेंचा २४ तासांत 'यू टर्न'; शपथविधीला हजर आणि आता म्हणाले...

अमोल कोल्हेंनी शरद पवारांना समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, पहिला मोहरा परतला अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली होती. मात्र आता अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळत आहे. लवकरच ते शरद पवार यांची भेट घेऊन, आपला राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (MP Amol Kolhe Resignation News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com