Pradeep Kurulkar Case: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामिनासाठी अर्ज; ९ ऑगस्टला होणार सुनावणी

Pune DRDO News : डॉ.प्रदीप कुरुलकर हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत.
Pradeep Kurulkar Case
Pradeep Kurulkar CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप कुरुलकर यांच्यावर आहे. या प्रकरणी प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी 'एटीएस'ने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात असून कुरुलकरांनी आता जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

या अर्जावर ९ ऑगस्टला सुनावणी होणार असून त्याच दिवशी व्हाइट लेयर ॲनॅलिसिस चाचणीबाबत आदेश होण्याची शक्यता आहे. एटीएसने सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त केलेल्या आहेत. डॉ.कुरुलकर तुरुंगातून बाहेर येऊन त्या डिव्हाइसमध्ये फेरफार करू शकत नाहीत, असे कुरुलकरांचे वकील अ‍ॅड.ऋषीकेश गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Pradeep Kurulkar Case
Pradeep Kurulkar Case: प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात मोठी घडामोड; 'डीआरडीओ'कडून झाली गंभीर चूक

विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. डॉ.कुरुलकरांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेयर अँनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली. पण एटीएसने मागणी केलेली पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी करण्यास डॉ. कुरुलकरांनी नकार दिला आहे.

Pradeep Kurulkar Case
Pradeep Kurulkar-Pakistani Hasina: आरोपपत्रातील 'ती' खास गोष्ट: पाकिस्तानी हसीनाला प्रदीप कुरुलकर म्हणायचे...

याबाबत बुधवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. पण व्हाइस लेयर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते. आरोपी तपासास सहकार्य करीत नसल्याने न्यायालयाने व्हाइस लेयर चाचणीसाठी परवानगी द्यावी, असा युक्तिवाद ॲड.फरगडे यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com